मुंबई : मुंबईत सध्या अनेक ठिकाणी बांधकाम सुरू आहेत. याचा परिणाम संपूर्ण शहरभर पाहायला मिळतोय. वाढत्या बांधकामामूळे अडगळही वाढलीय. त्यामुळे इथल्या प्राण्यांचा श्वास कोंडू लागलायं. चेंबुरमध्ये साप आढळल्याचा प्रकार समोर आलाय. चेंबूरमध्ये ७ फुटी अजगर आढळला. आरसीएफ औद्योगिक क्षेत्रातून या अजगराला पकडण्यात आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खाडी किनारी असलेल्या तिवरांच्या जंगलाची कत्तल सुरू असल्याने हे सरपटणारे प्राणी मानवी वस्तीत शिरत आहेत.


१५ किलो वजन


 ७ फूट लांबीच्या या अजगराचं वजन १५ किलो होतं. प्राणीमित्रांनी त्याची सुटका करून हा अजगर ठाण्याच्या जंगलात सोडून दिला.


असे प्रकार वारंवार समोर येत आहेत. पण वेळीच सर्पमित्रांनी धाव घेतल्यास मुक्या प्राण्याचे प्राण वाचतात.


नाहीतर साप चावेल या भीतीने लोक त्याला मारून टाकण्याचे प्रकार जास्त घडलेले पाहायला मिळतात.