Mumbai Crime News : लालबाग परिसरात लेकीने आपल्याच आईच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि त्यासोबत गेल्या तीन महिने ती घरात राहत होती. धक्कादायक म्हणजे चाळीमध्ये कुणाला मृतदेहाचा दुर्गंधी येऊन म्हणून 100 परफ्यूम आणि एअरफ्रेशनर खरेदी केले होते. या घटनेनंतर मुंबईकरांना धक्का बसला होता. त्यानंतर काही दिवसांनी अजून एका भयानक घटनेने मुंबई हादरली. ग्रँड रोडमधील एका चाळीत एका व्यक्तीने हातात चाकू घेऊन चाळीतील लोकांवर हल्ला केला होता. या घटननेत चार ते पाच जणांचा मृत्यू झाला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही महिन्यांमध्ये कौटुंबिक कलहामुळे गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सायन माहिम लिंक रोडच्या बाजूला एका प्लास्टिकच्या पिशवीत चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला. बुधवारी पहाटे पाचच्या सुमार मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षात फोन आला. त्या फोनवर या घटनेची माहिती दिली. मुलाच्या तोंडातून फेस येतं होता. उंदरांनी डोकं आणि उजवा मनगट चावला होता. चिमुकल्याची ही अवस्था पाहून पोलिसांचीही झोप उडाली होती. या घटनेनंतर मुंबई पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. 


नराधम बाप!


पोलिसांनी ताबडतोब सायन हॉस्पिटल गाठलं पण डॉक्टराने मुलाला मृत घोषित केलं. त्यानंतर या मुलाची हत्या झाल्याचा पोलिसांनी संशय आला आणि त्यांची तपास यंत्रणा वेगाने फिरायला लागली. तपासादरम्यान चिमुरड्याचं नाव अन्सारी असल्याचं पुढे आलं. या प्रकरणात मुलाच्या वडिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्यावर धक्कादायक माहिती समोर आली. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन वर्षांच्या चिमुकल्याची हत्या त्याचाच बापाने केली होती. शाहू नगर पोलिसांनी या नराधम बापाला बेड्या ठोकल्या आहेत. त्या व्यक्तीचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते आणि त्याला दुसरं लग्न करायचं होतं. तरुणीने पत्नी आणि मुलाला सोडण्याचा आग्रह या व्यक्तीकडे धरला. 


त्यामुळे या व्यक्तीने मुलाला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने घराजवळील गोडाऊनमध्ये नेलं आणि त्याची गळा दाबून त्याची हत्या केली.