Mumbai News : मुंबईकरांना (Mumbai Corona) कोरोनाच्या विळख्यातून दिलासा मिळत नाही तोच या शहरावर सातत्यानं आणखीही काही विषाणूंचा (Viral Infection) घातक मारा सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत मुंबईमध्ये सध्याच्या घडीला अॅडिनो या विषाणूचा संसर्ग वेगानं होत असून, हे प्रमाण 70 टक्क्यांनी वाढल्याची बाब समोर आली आहे. फक्त अॅडिनोच (adenovirus ) नव्हे, तर शहरातील 10 वर्षांहून कमी वय असणाऱ्या मुलांना राईनो आणि स्वाईन फ्लू (Swine flu) या विषाणूंचाही संसर्ग होत असल्याचं पाहायला मिळत आहे. नवजात शिशुपासून ते वर्षभराच्या बाळालाही या विषाणूंची लागण होत असल्याचं  निदर्शनास येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अॅडिनो म्हणजे काय? (what is adenovirus?)


श्वासनलिका, आतडं, डोळा आणि खासगी अवयवांपाशी हा विषाणू वाढतो. हा एक विषाणूजन्य आजाप आहे. ज्यामुळं सर्दी, न्यूमोनिया आणि पचनाशी संबंधित विकार होऊ शकतात. यामध्ये लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती कमी होत असल्यामुळं त्यांची विशेष काळजी घ्यावी. 


हेसुद्धा वाचा : Corona नंतर आणखी एका व्हायरसचा धोका; WHO ने दिला धोक्याचा इशारा 


अॅडिनो जीवघेणा नाही 


अॅडिनोच्या नावाची दहशत सध्या पालकांमध्ये पाहायला मिळत आहे. पण, इथं लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे अॅडिनो जीवघेणा नाही. या विषाणूपासून होणाऱ्या संसर्गाची प्राथमिक लक्षणं नाहीशी होण्यास 10 ते 12 दिवसांचा कालावधी लागतो. शिवाय यावर विशेष औषधही नसून ताप आणि Urine Infection वर दिली जाणारी प्रोबायॉटीक्स आणि डोळ्यांची जळजळ होत असल्यास त्यासाठी काही ड्रॉप्स घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. 


पालकांनी मुलांच्या दृष्टीनं काय काळजी घ्यावी? 


- मुलांचे हात स्वच्छ ठेवा 
- अस्वच्छ हातांनी सतत तोंडाला, नाकाला स्पर्श करु नका 
- मुलांना गर्दीच्या ठिकाणी नेऊ नका  
- मुलांचे डायपर बदलत असताना पालकांनी काळजी घ्या. 
- मुलांना सतत डोळे चोळण्यापासून रोखा. 


काय आहेत या अॅडिनो विषाणूच्या संसर्गाची लक्षणं ? (adenovirus symptoms)


- ताप येणं 
- घसा खवखवणं 
- डोळे लाल होणं 
- सर्दी, खोकला, जुलाब होणं