Corona नंतर आणखी एका व्हायरसचा धोका; WHO ने दिला धोक्याचा इशारा

कोरोनाच्या थैमानातून आता कुठे जग बाहेर येतंय. त्यात एका नवा व्हायरस महामारीचं आक्राळविक्राळ रुप धारण करु शकतो असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिलाय.

Updated: Feb 12, 2023, 11:36 PM IST
Corona नंतर आणखी एका व्हायरसचा धोका; WHO ने दिला धोक्याचा इशारा title=

Bird Flu : कोरोनाच्या थैमानातून आता कुठे जग बाहेर येतंय. त्यात एका नवा व्हायरस महामारीचं आक्राळविक्राळ रुप धारण करु शकतो असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिलाय. हा धोका देण्यात आलाय बर्ड फ्लू इन्फेक्शनबद्दल.. खरं तर बर्ड फ्लूचा माणसांना कोणताही धोका नसतो मात्र पहिल्यांदाच पक्ष्यांशिवाय सस्तन प्राण्यांमध्ये या व्हायरसचा फैलाव झाल्यानं WHO नं इशारा दिलाय. 

बर्ड फ्लूचा माणसांना धोका? 

  • पक्ष्यांव्यतिरिक्त सस्तन प्राण्यांमध्ये बर्ड फ्लू पसरलाय
  • बर्ड फ्लूच्या विषाणूंमध्ये परिवर्तन झालंय
  • त्यामुळेच मिंक, ऑटर, कोल्हा, रानमांजरीत बर्ड फ्लू व्हायरस पसरलाय

पक्ष्यांनंतर प्राणी आणि प्राण्यांनंतर माणसांमध्ये विषाणूंचं परिवर्तन झालं तर? असा धोका WHO ला वाटतो. मानवी शरिरावर बर्ड फ्लू व्हायरसचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बर्ड फ्लूपासून वाचण्यासाठी काय काळजी घ्याल त्यासंबंधीही WHOनं सूचना जारी केल्यात.

काय काळजी घ्याल? 

  • आजारी किंवा मृत प्राण्याला स्पर्श करु नका
  • स्थानिक वनअधिकारी, पशु डॉक्टरांना माहिती द्या
  • आजारी किंवा मृत कोंबड्यासंबंधी काळजी घ्या

बर्ड फ्लूचा मानवी शरिराला धोका नाही मात्र एव्हिअन फ्लूमध्ये मानवी शरिरात फैलाव करण्याची क्षमता आहे असं संशोधन WHOच्या अभ्यासात समोर आलंय. मात्र यामुळे लगेचच घाबरून जाण्याचं कारण नाही, पुरेशी काळजी घेतल्यास हा संभाव्य धोकाही टाळता येऊ शकतो.