गणेश कवडे, प्रतिनिधी, झी मीडिया, मुंबई : प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पाण्यात विसर्जित केल्यामुळं प्रदूषण होतं. पण मुंबईतल्या एका गणेशभक्तानं मूर्तीचं विसर्जनही केलं आणि गोरगरिब मुलांच्या गोड खाऊची सोयही केली. मुंबईतल्या खारमधील सामाजिक कार्यकर्ते हेमंत सुम्बड यांनी ३५ किलो चॉकलेटपासून गणेशाची मूर्ती तयार केली होती. ही मूर्ती हेमंत यांनी दुधात विसर्जित केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विसर्जनानंतर तयार झालेलं चॉकलेट दूध त्यांनी बेघर आणि गरजू मुलांना वाटलं. मुलांनी या गणेशविसर्जनाच्या खऱ्या अर्थानं आनंद लुटला. बाप्पाचं दुधात विसर्जन करून सुम्बड यांनी धार्मिक विधीही पार पाडला. शिवाय चॉकलेटचं दूध मुलांना वाटून समाजसेवाही केली. प्रत्येक नागरिकानं गणेशाची प्रतिष्ठापना आणि विसर्जन असं कल्पक पद्धतीनं केल्यास तो गणेशोत्सव आगळावेगळा ठरेल असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.