Mumbai Coastal Road News In Marathi : मुंबई सागरी किनारा प्रकल्प अर्थातच कोस्टल रोड हा मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून त्याचे काम वेगात सुरु आहे. मुंबईकरांची वाहतूक कोंडी संपवण्यासाठी प्रियदर्शिनी पार्क ते वरळी सी-लिंक दरम्यान 10.58 किमीचा कोस्टल रोड बांधण्यात आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर 70 टक्के वेळेची बचत होणार असून इंधनाचीही 34 टक्के बचत होणार आहे. मरीन ड्राईव्ह ते वांद्रे वरळी सी लिंक दरम्याम साडेदहा किलोमीटरचा कोस्टल रोड हा प्रकल्पाचा हा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. मात्र तरीही या मार्गिकेवरुन प्रवास करण्यासाठी मुंबईकरांना आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई महानगपालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी कोस्टल रोडची एक मार्गिका म्हणजेच वरळी ते मरीन ड्राईव्ह दरम्यान चार लेनच्या एका मार्गिकेचे उद्घाटन 19 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होते. मात्र मोदींचा दौरा रद्द झाल्यामुळे उद्घाटनही पुढे ढकलण्यात आले आहे. उद्घाटन पुढे ढकलण्यात आल्याने पहिल्या टप्प्यातील थडाणी जंक्शन वरळी ते मरीन ड्राइव्ह दरम्यानचा मुंबईकरांची सफर हुकली आहे. दरम्यान चार लेनच्या एका मार्गिकेचे 100 टक्के काम पूर्ण झाले असून एकूण प्रकल्पाचे 86 टक्के काम पूर्ण झाल्याचे पालिकेने सांगितले. प्रकल्पाचे काम पूर्ण झाले नसतानही लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी काही भाग सुरू करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. 


प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सी लिंक या एकूण 10.58 किमी मार्गाचे 85 टक्के काम पूर्ण झाले असून पहिल्या टप्प्याचे उद्घाटन 19 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याची घोषणा महापालिका आयुक्त प्रशासक इक्बाल सिंग चहल यांनी केली होती.  कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात येणार असून तीन लेनची एकच बाजू सुरु करण्यात येणार आहे. यामुळे वरळीहून मरीन ड्राइव्ह येथे जाता येणार आहे.  हा मार्ग सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत फक्त बारा तासच सुरु राहणार आहे. उरलेल्या वेळेत कोस्टल रोडचा उत्तरेकडील मार्ग पूर्ण करण्याचे काम आणि कोस्टल रोड, वरळी व शिवडी सागरी पूल जोडण्याचे काम करण्यात येणार आहे. कोस्टल रोडच्या उद्घाटनाची तारीख अद्याप ठरलेली नसल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. मात्र 15 मे पर्यंत संपूर्ण कोस्टल रोड पूर्णपणे कार्यान्वित होईल असे सरकारने जाहीर केले आहे. 


प्रकल्प कसा आहे?


मुंबई किनारा रोड प्रकल्पांतर्गत वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या प्रिन्सेस स्ट्रीट ते दक्षिण टोकायापर्यंत बांधकाम सुरू असून प्रकल्पाचे 84 टक्के काम पूर्ण झाले आहे. या मार्गाची लांबी 10.58 किलोमीटर आहे. समुद्रखालून जाणारे दोन समांतर बोगदे हे या सागरी किनारा मार्ग प्रकल्पाचे वैशिष्ट्य आहेत. हा प्रकल्प मोठा आणि गुंतागुंतीचा आहे. प्रस्तावित समुद्रतळ भरणे, भिंती बांधणे, रस्ते, तलाव, सागरी पायवाट, हिरवीगार जागा, वाहनतळ, उद्याने अशा अनेक कामांचा समावेश आहे. आतापर्यंत 79 टक्के काम पूर्ण झाले असून 11 हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत.