लोकसभा पराभवाची जबाबदारी स्वीकारत मिलिंद देवरा यांचा राजीनामा
निवडणुकीसाठी तयार होण्याची वेळ फारच कमी आणि खूप उशिरा देण्यात आली होती
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी आपल्या पदावरून राजीनामा दिला आहे. हा राजीनामा देताना त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत मुंबई शहर युनिटचे निरीक्षण करण्यासाठी तीन वरिष्ठ नेत्यांच्या सामूहिक नेतृत्वाची तात्पुरती स्थापना करण्याची शिफारस केली.
काँग्रेसमध्ये पुढील राष्ट्रीय भूमिका स्वीकारण्यासाठी देवरा दिल्लीत जाऊ शकण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या राजीनाम्यासंदर्भातील एक पत्र नुकतेच देवरा यांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे सुपुर्द केल्याची समोर आली आहे. महाराष्ट्रात काँग्रेससाठी भाजप-शिवसेना आणि वंचित आघाडीच्या प्रभावाचा निषेध करणं हे काँग्रेससाठी एक मोठं आव्हान आहे, असे त्यांनी राजीनामा देताना स्पष्ट केलं आहे.
देवरा यांच्या कार्यालयाच्या निवेदनात म्हटलं, २६ जून रोजी राहुल गांधी यांना दिल्लीत भेटल्यानंतर लवकरच पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली. देवराच्या कार्यालयातून आलेल्या निवेदनात म्हटले आहे, "हे सारंकाही अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस मल्लिकार्जुन खडगे आणि के.सी. वेणुगोपाल यांना सांगण्यात आलं आहे," हे पाऊल एआयसीसीचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या राजीनामा देण्याबरोबरच एकनिष्ठता आणि सामूहिक जबाबदारीची अभिव्यक्ती म्हणून उचलण्यात आले.
अध्यक्ष म्हणून राजीनामा देताना देवरा यांनी ४ जुलै रोजी राहुल गांधी यांच्या मुंबई भेटीची व्यवस्था केली होती. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वार्धात देवरा यांना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले होते. निवडणुकीसाठी तयार होण्याची वेळ फारच कमी आणि खूप उशिरा देण्यात आली होती. आपल्या अल्प कार्यकाळात त्यांनी पक्षाची प्रतिमा उंचावली. अशी आशा आहे की पुन्हा एकदा बहुभाषिक, बहुसांस्कृतिक आणि सामाजिक-आर्थिकदृष्ट्या समावेशक आदर्शांकडे परत येईल. पक्ष, त्यांच्या नेतृत्वाखालील मुंबई-शिवसेना गठित करण्यासाठी एक निर्णायक लढा दिला, असे त्यांनी या निवेदनात स्पष्ट केले आहे.