Mumbai Corona Update : मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत दिलासादायक घट, पाहा आज किती रुग्ण?
मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घट होताना दिसत आहे.
Mumbai Corona Update : मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घट होताना दिसत आहे. काल मुंबईत ७ हजार ८९५ रुग्ण आढळून आले. आज त्यात आणखी घट झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही दिलासादायक बातमी आहे.
मुंबईत आज किती रुग्ण?
मुंबईत गेल्या 24 तासांमध्ये 5 हजार 956 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर गेल्या चोवीस तासात १५ हजार ५५१ रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. त्यामुळे मुंबई बरे झालेल्या रुग्णांचा दर ९३ टक्के इतका झाला आहे. तर रुग्ण दुपटीचा दर ५५ दिवसांवर आला आहे.
तर आज 12 जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे. मृत रुग्णांपैकी ९ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. तर ११ रुग्णांचं वय ६० वर्षांपेक्षा अधिक आहे. मृतांमध्ये ९ पुरुष आणि ३ महिलांचा समावेश आहे.
मुंबईत सध्या ५० हजार ७५७ सक्रिय रुग्णांची संख्या आहे.
मुंबईतील तारीखनिहाय आकडेवारी
1 जानेवारी - 6 हजार 347
2 जानेवारी - 8 हजार 063
3 जानेवारी - 8 हजार 082
4 जानेवारी - 10 हजार 860
5 जानेवारी - 15 हजार 166
6 जानेवारी - 20 हजार 181
7 जानेवारी- 20 हजार 971
8 जानेवारी- 20 हजार 318
9 जानेवारी - 19 हजार 474
10 जानेवारी - 13 हजार 648
11 जानेवारी - 11 हजार 647
12 जानेवारी - 16 हजार 420
13 जानेवारी - 13 हजार 702
14 जानेवारी - 11 हजार 317
15 जानेवारी - 10 हजार 661
16 जानेवारी - 7 हजार 895