मुंबई : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुंबईत दिवसागणिक दैनंदिन कोरोना रुग्णांच्या (Mumbai Corona Update) आकड्यांमध्ये घट होत आहे. मात्र दुसऱ्या बाजूला पुण्यात कोरोनाने डोकं वर काढलंय. पुण्यात दररोज मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढतोय. त्यामुळे एका बाजूला दिलासा आणि दुसऱ्या बाजूला काहीशी चिंताजनक स्थिती पाहायला मिळतेय. (mumbai corona update 19 jaunary 2022 today 6 thousand 32 positive patients 12 deaths in city)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत गेल्या 24 तासांमध्ये 6 हजार 32 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर पुण्यात मात्र कोरोना थांबायचं नाव घेत नाहीये. 



पुण्यात गेल्या 24 तासांमध्ये 6 हजार 441 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर दिवसभरात 4 हजार 857 जण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण 13  जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पुण्यात दररोज रुग्णांच्या संख्येत वाढ पाहायला मिळतेय. त्यामुळे चिंतेत वाढ झाली आहे. 


मुंबईतील तारीखनिहाय आकडेवारी


1 जानेवारी -  6 हजार 347


2 जानेवारी -  8 हजार 063


3 जानेवारी -  8 हजार 082


4 जानेवारी - 10 हजार 860


5 जानेवारी - 15 हजार 166 


6 जानेवारी - 20 हजार 181


7 जानेवारी- 20 हजार 971


8 जानेवारी- 20 हजार 318


9 जानेवारी - 19 हजार 474


10 जानेवारी - 13 हजार 648


11 जानेवारी - 11 हजार 647


12 जानेवारी - 16 हजार 420 


13 जानेवारी - 13 हजार 702


14 जानेवारी - 11 हजार 317 


15 जानेवारी - 10 हजार 661 


16 जानेवारी - 7 हजार 895


17 जानेवारी - 5 हजार 956


18 जानेवारी - 6 हजार 149 


19 जानेवारी - 6 हजार 32