मुंबई : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत (Mumbai Corona Update) लक्षणीय वाढ पाहायला मिळाली. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह मुंबईकरांची चिंतेत वाढ झाली होती.  दरम्यान आज शहरातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांना काहीशा प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मुंबईत गेल्या 24 तासांमध्ये 20 पेक्षा कमी पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दिलासादायक बाब म्हणजे 82 टक्के रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणं नाहीत. (mumbai corona update 9 january 2022 today 19 thousand 474 corona patients found in city)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिवसभरात किती रुग्ण?


मुंबईत गेल्या 24 तासात 19 हजार 474 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 8 हजार 63 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर हा 85 टक्क्यांवर पोहचला आहे. तर मुंबईतील कोरोना रुग्णवाढीचा दर हा 41 दिवसांवर आला आहे. तसेच कोरोनामुळे आज 7 जणांचा मृत्यू झाला आहे.



धारावीत किती रुग्ण? 


कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत धारावी हा भाग सर्वात मोठा हॉटस्पॉट होता. या भागात ही गेल्या काही दिवसांपासून रुग्णवाढ होत आहे. धारावीत गेल्या 24 तासांमध्ये 123 रुग्ण आढळले आहेत. 


काहीशी चिंताजनक बाब अशी की नेहमीच गजबज असलेल्या दादरमध्ये 190 आणि माहिममध्ये 235 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे या तिन्ही ठिकाणी मिळून  एकूण 548 रुग्ण आढळले आहेत.  


पुण्यात कोरोनाचा स्फोट


पुण्यातही मोठ्या प्रमाणात रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. शनिवार 8 जानेवारीच्या तुलनेत आज जवळपास 80 टक्के अधिक रुग्ण आढळले आहेत. पुण्यात एकूण 4 हजार 29 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 688 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 


मुंबईतील तारिखनिहाय आकडेवारी


1 जानेवारी -  6 हजार 347


2 जानेवारी -  8 हजार 063


3 जानेवारी -  8 हजार 082


4 जानेवारी - 10 हजार 860


5 जानेवारी - 15 हजार 166 


6 जानेवारी - 20 हजार 181


7 जानेवारी- 20 हजार 971


8 जानेवारी- 20 हजार 318


9 जानेवारी - 19 हजार 474