मुंबई : मुंबईकरांसाठी सलग दुसऱ्या दिवशी दिलासादायक बातमी आहे.  शहरात गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत (Mumbai Corona Update) लक्षणीय वाढ पाहायला मिळाली. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह मुंबईकरांची चिंतेत वाढ झाली होती.  दरम्यान आज सलग दुसऱ्या दिवशी शहरातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांना काहीशा प्रमाणात दिलासा मिळाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत गेल्या 24 तासांमध्ये ११ हजार ६४७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. कालच्या तुलनेत जवळपास २ हजारांनी घट झाली आहे. मुंबईमध्ये काल 13 हजार 648 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. विशेष म्हणजे नवीन रुग्णांपेक्षा बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आज जास्त आहे. गेल्या २४ तासात १४ हजार ९८० रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परतले. त्यामुळे मुंबईत रिकव्हरी रेट ८७ टक्क्यांवर पोहचला आहे.


दिवसभरात २ रुग्णांचा मृत्यू  झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत एकूण मृत्यूंची संख्या १६ हजार ४१३ इतकी झाली आहे.


वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह उपनगरात कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. शिवाय मास्क सोशल डिस्टन्सिंग पाळणं बंधनकारक असल्याचं महापौरांनी सांगितलं आहे. शाळाही ऑनलाइन सुरू करण्यात आल्या आहेत.