Mumbai Crime: ज्येष्ठ नागरिकांना एकट्यात गाठून लुटण्याचे अनेक प्रकार शहरांमध्ये घडत असतात. मुंबईत भरदिवसा दरोडा घालून ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याला लुटण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेत आजीला आपला जीव गमवावा लागला आहे. ताडदेवमधून हा प्रकार समोर आल्यानंतर परिसरात खळबळ माजली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण मुंबईतील ताडदेव येथील युसूफ मंझिल इमारतीत एक ज्येष्ठ नागरिक दाम्पत्य राहत होते. हे वृद्ध जोडपे गेल्या अनेक वर्षांपासून एकाच घरात राहत असून त्यांना तीन मुले आहेत. मुले आई वडिलांपासून  वेगळी राहतात.या दाम्पत्यावर दरोडेखोरांनी पाळत ठेवली होती. रविवारी 3 तीन दरोडेखोरांनी ज्येष्ठ नागरिक दाम्पत्य राहत असलेल्या घरात एन्ट्री घेतली. यानंतर दोघेही नवरा बायकोचे हात पाय बांधले, त्यांच्या तोंडाला पट्टी बांधली आणि घर लुटले. सुरेखा आणि मोहन अग्रवाल असे या दाम्पत्याचे नाव आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. 


ताडदेवमध्ये घडलेल्या या घटनेत 70 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे, तर तिचा पती जखमी झाले आहेत. घटना घडली तेव्हा पीडित सुरेखा अग्रवाल आणि त्यांचे 75 वर्षीय पती मदन मोहन अग्रवाल दोघेच फ्लॅटमध्ये होते, अशी माहिती  ताडदेव पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिली. सेलो टेप तोंडावर लावल्याने गुदमरून महिलेचा मृत्यू झाल्याचा पोलिसांना संशय आहे, मात्र महिलेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी मुंबईच्या नायर रुग्णालयात नेण्यात आला आहे.


सकाळी ६ वाजता हे जोडपे त्यांच्या फ्लॅटमधून फिरायला बाहेर पडत असताना तिघे दरोडेखोर तिथे पोहोचले. त्यांनी जोडप्याच्या तोंडाला टेप लावून त्यांचे हात पाय बांधले. यानंतर फ्लॅटमधील सोन्याचे दागिने, घड्याळे आणि रोख रक्कम घेऊन पळून गेले, अशी माहिती देण्यात आली.हातपाय बांधलेले असतानाही मदन मोहनने कसेतरी दारात जाऊन आवाज करु लागले. त्यानंतर शेजाऱ्यांनी त्यांची सुटका करून पोलीस ठाण्यात माहिती दिली. इमारतीच्या अगदी खाली एक जीन्सचे दुकान आहे; तिथे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावरून पोलिसांना तिन्ही आरोपींनी तोंड झाकल्याचे समजले.


घरच्या लाईट मीटरमध्ये सापडला 15 कोटींचा हिरा, 21 वर्षांनी 'असा' लागला चोरीच्या घटनेचा छडा


तोपर्यंत सुरेखा अग्रवाल बेशुद्ध झाल्या होत्या. त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.


चोरी करणाऱ्या आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) संबंधित कलमांतर्गत एफआयआर नोंदवून प्रकरणाचा तपास केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 


Flipkartवर वस्तू खरेदी करताना ग्राहकांना अडचणी, ट्विटरवर तक्रारींचा पाऊस


KEM रुग्णालयाच्या चुकीची शिक्षा 52 दिवसांच्या बाळाला


मुंबईत दुसरीकडे घडलेल्या एका घटनेत नालासोपारा इथं राहाणाऱ्या राहुल चव्हाण यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. व्यवसायाने रिक्षा चालक असणाऱ्या राहुल चव्हाण यांच्या पत्नी अश्विनी चव्हाण यांची मुदतपूर्व प्रसूती 19 जून रोजी मुंबईतल्या परळ इथल्या के ई  एम रुग्णालयात (KEM Hospital) झाली. नवजात बाळ (New Born Baby) सहा महिने दहा दिवसांचं होतं आणि वजन एक किलो 26 ग्राम होत. वजन फारच कमी असल्यामुळे बाळाला नवजात शिशु दक्षता विभागात ठेवण्यात आलं. बाळाच्या हाताला सलाईन (Saline) लावण्यात आली. पण या सलाईन मधून देण्यात येणाऱ्या औषधामुळे बाळाचा हात काळा पडू लागला. बाळाची आई अश्विनी चव्हाण यांनी ही गोष्ट डॉक्टरांच्या निदर्शनास आणून दिली.  मात्र होईल बरे असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. पण दिवसागणिक बाळाचा हात खूपच काळा पडू लागला आणि त्याच्या हाताची बोटं वाकडी झाली. बाळाच्या हाताला संसर्ग बळवला होता. त्यामुळे कोपरापासून बाळाचा हात डॉक्टरांना कापावा लागला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच बाळाचा हात कापावा लागल्याचा आरोप राहुल चव्हाण यांनी केलाय. पत्नी म्हणजे अश्विनीने 15 जुलैला नवजात शिशु दक्षता विभागातील डॉक्टरांना याबाबत माहिती दिली होती. डॉक्टरांनी त्यावेळीच उपचार केले असते तर बाळाचा हात कापण्याची वेळ आली नसती असा आरोप राहुल चव्हाण यांनी केली आहे.