PUBG Love Story: पब्जी गेम भारतात 2020 साली बॅन करण्यात आला. सुरक्षेच्या कारणास्तवर चायनीज अॅप बंद करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला, तेव्हापासून पब्जीदेखील बंद झाला आहे. पण त्यावेळी पब्जी खेळताना झालेल्या लव्ह स्टोरी आता 3 वर्षांनंतर समोर येऊ लागल्या आहेत. कोणी पब्जी खेळताना प्रेमात पडून पाकिस्तानातून भारतात येतंय, तर कोणी भारत सोडून जातंय. असाच एक प्रकार मुंबईतल्या सांताक्रूझमधून समोर आला आहे. येथे पब्जी खेळताना प्रेम झालं पण आता प्रियकराविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय आहे हे प्रकरण? जाणून घेऊया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई पोलिसांनी सांताक्रूझ येथे राहणाऱ्या तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे या तरुणाच्या कथित प्रेयसीनेच पोलिसात तक्रार दिली आहे. काही वर्षांपूर्वी मी PUBG गेम खेळताना या व्यक्तीच्या संपर्कात आले होते. यानंतर तरुणाने माझ्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिले होते, असे महिलेने पोलिसांना सांगितले. लग्नाचे आश्वासन देऊन मला हॉटेलमध्ये नेऊन माझ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. यादरम्यान त्याने व्हिडिओही बनवला असून मला ब्लॅकमेल करायला सुरुवात केल्याचे तिने तक्रारीत सांगितले.


आता तरुण लग्नास नकार देत असल्याचे महिलेचे म्हणणे आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी सांताक्रूझ येथे राहणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. आरोप करण्यात आलेला तरुण सध्या फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.


या तरुणाला मी 2020 मध्ये पब्जीवर भेटली होती आणि त्यानंतर आम्ही चॅटिंगला सुरुवात केली. यानंतर आम्ही दोघेही अनेकवेळा रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये भेटलो, अशी कबुली पीडित महिलेने पोलिसांसमोर दिली.


मोबाइलवर व्हिडिओ बनवून ब्लॅकमेलिंग 


तरुणाने तिच्याशी लग्न करण्याचे वचन दिले होते. हॉटेलमध्ये पहिल्यांदा भेटल्यावर त्याने मोबाईलवरून व्हिडिओ बनवला आणि नंतर ब्लॅकमेलिंग सुरू केले, असे महिलेने सांगितले. 


तरुण आपल्याला अनेक दिवसांपासून धमकावत तिचा लैंगिक छळ करत असल्याचे महिलेने सांगितले. पंतनगर पोलीस तरुणाच्या शोधात एक-दोन ठिकाणी गेले होते, मात्र तो अद्याप सापडला नाही, असे पोलिसांनी सांगितले. 


PUBG गेम खेळताना झालं प्रेम


पब्जी गेम वारंवार खेळल्याने डोक्यावर परिणाम झालेले अनेक तरुण आपण पाहिले आहेत. दरम्यान पब्जी खेळताना गेम पार्टनरसोबतच प्रेम झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणातील तरुणी पाकिस्तानी तर तरुण हा भारतीय आहे. त्यांनी प्रेमात एकत्र राहण्याच्या इतक्या आणाभाक घेतल्या की भारत-पाकिस्तानची सीमा देखील तिने पार केली. या तरुणीचे नाव सीमा असून यातील तरुणाचे नाव सचिन असे आहे. 


सीमा आणि सचिन हे एकमेकांचे पब्जी गेममधील पार्टनर होते. गेम खेळता खेळता कधी प्रेम झालं हे त्यांना कळालं नाही. आता दोघांच्यामध्ये देशाची सीमा असल्याने भेट अशक्य होती. पण प्रेम आंधळ असतं असं म्हणतात. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला. आपल्या गेम पार्टनलला लाईफ पार्टनर बनवण्यासाठी पाकिस्तानच्या सीमा (27) ने दोन देशांची सीमा ओलांडली. एवढंच नव्हे तर येताना ती आपल्या चार मुलांना घेऊन रबुपुरा शहरात पोहोचली.