Mumbai Crime : मुंबईत एका मेक्सिकन महिलेवर बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मेक्सिकोतील 31 वर्षीय महिला डिस्क जॉकीवर (डीजे) वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. बांद्रा पोलीस ठाण्यात पीडितेने गेल्या आठवड्यात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर 35 वर्षीय आरोपीला शुक्रवारी अटक करण्यात आली. मात्र दुसरीकडे आरोपीने वकिलाच्या माध्यमातून धक्कादायक खुलासे केले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेक्सिकोतील महिला डिस्क जॉकीने बलात्कार झाल्याची तक्रार वांद्रे पोलीस ठाण्यात केली होती. अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या आठवड्यात पीडितेच्या आरोपीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात केली होती. यानंतर शुक्रवारी 35 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीसुद्धा डीजे म्हणून काम करतो. पीडितेच्या तक्रारीनुसार, आरोपीने 2019 पासून अनेकवेळा बलात्कार केला. ही महिला सध्या मुंबईत राहते आणि आरोपी तिचा व्यवस्थापक असल्याचे अधिकाऱ्याने तिने सांगितले.


महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले की, मी 2017 मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोपीला भेटली होती. आरोपीने जुलै 2019 मध्ये वांद्रे येथील त्याच्या घरी माझ्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेनंतर आरोपीने तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केला.  आरोपी मला धमकावत असे की जर ती मान्य नसेल तर तुला कामावरून काढून टाकेन. आरोपी मला तिच्या खासही फोटोंच्या माध्यमातून ब्लॅकमेल करायचा. या प्रकाराने मी खूप घाबरली होती आणि पोलिसांसमोर येण्याचे धाडस करू शकली नाही. पण, आज मी कंटाळून त्याच्या विरोधात आवाज उठवण्याचा निर्णय घेतला.'


दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या तक्रारीनुसार आरोपीविरुद्ध कलम 376, 377, 354 अंतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आरोपीला अटक केल्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. तपासात जे काही समोर येईल, त्याआधारे पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.


दुसरीकडे, आता आरोपीच्या वकिलाने बलात्कार आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे. वकिलाचा सांगितले की, 'आरोपी आणि पीडितेचे प्रेमसंबंध होते. त्यांनी एकत्र काम केले आणि एकत्र प्रवासही केला. हा सर्व परस्पर संबंधांचा विषय होता. लैंगिक शोषणाचे आरोप अत्यंत धक्कादायक आहेत कारण दोघेही प्रेमसंबंधात होते. तक्रारदार महिला रिलेशनशिपमधून बाहेर जायची आणि नंतर परत आली. असे तिने अनेकदा केले. माझा अशील तिला टुमॉरोलँड म्युझिक फेस्टिव्हलमध्ये परफॉर्म करण्यासाठी घेऊन गेला होता. माझ्या अशीलाने तिला मदत केली. त्यामुळे तिला चांगले व नियमित पैसे मिळू लागले. तिचे उत्पन्न वाढले होते. पण तिला मानसिक त्रास होता आणि त्यामुळे दोघेबी उपचारासाठी गेले. इतरांनीही तिच्या वर्तनाबद्दल अनेकांनी तक्रार केली होती. दुसऱ्याशी लग्न करून ती फसवणूकही करत होती.'