दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मीलमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्मारकाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उंचीच्या वादानंतर आता इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या उंचीवरून वाद सुरू झालायं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची उंची 350 फूट ठेवण्याची होती मागणी याआधी करण्यात आली होती. मात्र आता नव्या आराखड्यानुसार पुतळ्याची उंची 251 फुट, तर खालचा चौथरा 99 फूट होणार आहे.


सरकारला जाब विचारणार 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 आंबेडकरी समाजात याप्रकरणी मोठ्या प्रमाणात नाराजी असून याप्रकरणी सरकारला जाब विचारणार असल्याचे सांगण्यात येतंय. याआधी मुख्यमंत्र्यांच्या भाषणातूनही बाबासाहेबांचे भव्यदिव्य स्मारक असेल असे सांगण्यात येत होते. मग आता त्याचं काय झालं ? असा प्रश्न अनुयायी उपस्थित करत आहेत.


सरकारच्या भूमिकेकडे लक्ष 


 स्मारकाच्या आढावा बैठकीत सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी याप्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे मोठा उद्भवण्याची शक्यता आहे. सरकार यावर काय भूमिका घेतं आणि काय निर्णय देतं याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.