मुंबई : Mumbai Drugs Case : NCBचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्याबाबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केला आहे. जी पार्टी झाली त्यात एक आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया होता. तो दाढीवाला होता. त्याचा समीर वानखेडे यांच्याशी संबंध आहे. पार्टीचे सीसीटीव्ही फुटेज तपासा आणि खरे काय ते सांगा, असे थेट आव्हान मलिक यांनी दिले आहे. दरम्यान, वानखेडे यांनी टार्गेटेड लोकांना यामध्ये पकडले आहे. 1300 लोकांची चौकशी का केली नाही. केवळ 12 ते 13 जणांचीच चौकशी का केली. पोलिसांची परवानगी न घेताच रेव्ह पार्टी करण्यात आली, असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. (Mumbai Drugs Case: International Drug Mafia Participated in Party - Nawab Malik)


मलिक यांचे नवे ट्विट, वानखेडे यांच्याबाबत आणखी फोटो केले शेअर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धर्माच्या नावावर मला राजकरण करण्याची गरज नाही. आंतराष्ट्रीय ड्रग्ज माफिया रेव्ह पार्टीत होता. येथे ड्रग्ज सापडलेले नाही. जी आयोजित पार्टी करण्यात आली होती. त्याचे संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज तपासा. मग काय ते खरं पुढे येईल. या पार्टीत मोठा ड्रग्ज माफिया होता. त्याची का चौकशी झाली नाही. माझी मागणी आहे की, समीर वानखेडे, के पी गोसावी, प्रभाकर साईल आणि समीर वानखेडे यांच्या ड्रायव्हरचा सीडीआर मागवण्यात यावा, अशी मागणी यावेळी नवाब मलिक यांनी केली.


काल मी माध्यमांसमोर बोलत असताना मला जे पत्र मिळाले होते, ते मी एनसीबी डीजी यांना पाठवले आहे. याची दखल घेतली जाईल, असे सांगितले होते. मात्र ज्या पद्धतीचे आक्षेप त्या पत्रात आहेत. त्याची दखल घेणे गरजेचे आहे. या पत्राकडे दुर्लक्ष करू नये, असे नवाब मलिक म्हणाले. ज्या गाडीचा वापर झाला आहे इलेक्ट्रीकल तपासणी झाली पाहीजे.


'चुकीच्या गोष्टी समोर आणणार' 


एक एफआयआर नोंद झाली आहे. त्यामध्ये एकाला ही अटक झालेली नाही. ज्यावेळा एखादा अभिनेता, अभिनेत्री एनसीबी चौकशीला येत होती त्यामध्ये एकालाही अटक झालेली नाही. ज्या चुकीच्या गोष्टी असतील त्या मी समोर आणणार आहे. क्रुझ पार्टीचे आयोजन करण्यात आले त्यावेळी कोणतीही परवानगी घेतलेली नाही. टार्गेटेड लोकांना यामध्ये पकडले आहे. जी पार्टी झाली त्यात एक आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया होता. दाढीवाला. त्यांचा समीर वानखेडे यांच्याशी काय संबंध? सीसीटीव्ही फुटेज तपासा. माझ्याकडे क्रूझवरील ड्रग माफियाचे डान्स व्हिडिओ आहेत. ड्रग माफियाला हात लावला नाही आणि इतरांना पकडले. या ड्रग माफियाची प्रेयसी बंदुक घेऊन होती. माझ्याकडे ड्रग माफियाचे नाव आहे. तिथे ड्रग विकले गेले. फक्त प्रसिद्धीसाठी काही लोकांना गोवण्यात आले. त्याच्यावर कारवाई करा. त्याला समोर आणा, नाहीतर आम्ही त्याला सार्वजनिकरित्या जाहीर करू, असे थेट आव्हान नवाब मलिक यांनी दिले.


ड्रग्ज पार्टी नाही तर रेव्ह पार्टी झाली. दाढिवाला ड्रग माफियाने ही पार्टी आयोजित केली होती. दोन दिवस तिकडे हा माफिया होता. ड्रग तस्कर आहे. तिहार, राजस्थानमध्ये तुरुंगात होता. दाढीवाला ड्रग माफिया हा आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया असून तो समीर वानखेडे यांचा मित्र आहे, असा आरोप मलिक यांनी केला.


वानखेडे यांनी धर्मांतर केले - मलिक


आज जो निकाह नामा दिला आहे, त्यावरून स्पष्ट होत आहे की वानखेडे यांनी धर्मांतर केले आहे. समीर वानखडे यांनी खोटे कागद बनवले आणि नोकरी मिळवली. त्यांची नोकरी जाणार. दोन ते सात वर्षाची शिक्षा खोटी कागदपत्रे बनवल्याच्या आरोपा खाली होते, असे नवाब मलिक म्हणाले.


दाऊद वानखेडे यांचे सर्टीफिकेट दाखवत आहेत. बाबांचे आजोबांचे पण ते सर्टीफिकेट खोटे आहेत. खरे सर्टीफिकेट दाखवा ना. मी धर्माच्या नावाखाली कोणावरही टीका करत नाही. यातून दलित मुलांची संधी हिसकावून घेतली गेली आहे. हा विषय खासगी नाही. सर्टीफिकेट खोटे असल्याचे मी सांगतोय. याची तक्रार दाखल होईल, असे मलिक म्हणाले.