मोठी बातमी! मुंबईतील ईडीच्या अतिरिक्त संचालकांची बदली
ED Additional Director: निखिल गोविला हे ईडीचे आधीचे अतिरिक्त संचालक म्हणून काम पाहत होते.
ED Additional Director: राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी ज्या संस्थेचा धसका घेतलाय, त्या संस्थेसंदर्भात महत्वाची अपडेट आहे. मुंबईतील अंमलबजावण संचानलायाच्या अतिरिक्त संचालकांची बदली करण्यात आली आहे. यावेळची मोठी बातमी समोर येत आहे.
निखिल गोविला हे ईडीचे आधीचे अतिरिक्त संचालक म्हणून काम पाहत होते. गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते रोहित पवार यांना ईडीने आपल्या कार्यलयात बोलावले होते. सध्या शिवसेना आमदार रवींद्र वायकर, युवासेना नेते सुरज चव्हाण यांची ईडी चौकशी सुरु आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावरही ईडीची टांगती तलवार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर अतिरिक्त संचालकांसदर्भात माहिती समोर आली आहे.
निखिल गोविला यांच्यानंतर ईडीचे मुंबई विभागाचे अतिरिक्त संचालक म्हणून अमित दुआ आज पदभार स्वीकारणार आहेत. काही वेळापुर्वी मुंबई ईडी कार्यालयात आयआरएस अधिकारी अमित दुआ दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात अमित दुवा घेणार पदभार घेणार आहेत.
ED अधिकारी कसे बनतात? पगार, नोकरीतील आव्हाने सर्वकाही जाणून घ्या
भाजप आणि केंद्राकडून ईडीचा गैरवापर होत असून विरोधकांना नामोहरण करण्यासाठी ईडीचा वापर होत असल्याचा आरोप विरोधक करत असतात. विधानसभा, लोकसभा निवडणुका तोंडावर असताना विरोधी पक्षातील नेत्यांची ईडी चौकशी सध्या सुरु आहे. या सर्वात ईडी अतिरिक्त संचालकांची भूमिका महत्वाची असणार आहे.