मुंबईत भरधाव ट्रकने दुचाकीला उडवले, दोघांचा मृत्यू
अंधेरी लिंक रोडवरील लक्ष्मी नगर येथील सिग्नलवर एका भरधाव ट्रकने दुचाकीवरील दोघाना चिरडले.
मुंबई : घाटकोपरच्या अंधेरी लिंक रोडवरील लक्ष्मी नगरयेथील सिग्नलवर एका भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिलीय. यात दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाले आहे. मोहम्मद जुमिल बशीर सय्यद आणि रजा मोहम्मद जमील सय्यद अशी मृतांची नावे आहेत. या अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रकची तोडफड करत ट्रक चालकाला बेदम मारहाण केली. यात ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहे. या संपूर्ण घटनेनंतर जमावानं या परिसरात रास्तारोको केला.
या घटनेनंतर संतप्त जमावाने ट्रकला घेराव घातला. या अपघातानंतर ट्रकची तोडफोड करत जमावाने परिसरात रास्तारोको केला. पंतनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर येथील परिस्थीती नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश आले तरी येथे तणाव कायम आहे. या अपघातात दुचाकीवरील पिता-पुत्रांचा मृत्यू झाला. दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान, सिमेंटने भरलेला ट्रक जात होता. यावेळी ट्रकने दुचाकीला चिरडल्याने नागरिक संतप्त झालेत. त्यांनी ट्रकची तोडफोड केली. मागील अनेक वर्षांपासून भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. अजूनही ते काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहे.