मुंबई : सोन्याचे दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याखाली १६ लाख रुपये किमतीच्या दागिन्यांसह पश्चिम बंगालमध्ये पळून गेलेल्या दोघा कामगारांना पोलिसांनी अटक केली आहे. यावेळी तब्बल १० लाख रूपयांचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२० नव्हेंबरला झवेरी बाजारातील एका व्यापाऱ्याने तब्बल अर्धा किलो वजनाचे सोन्याचे दागिने पॉलिश करण्यासाठी दिले होते. तब्बल १६ लाख रूपये किमतीचे हे दागिने व्यापाऱ्याने आपल्या विश्वासातील कारागीर फिरोज मुल्ला आणि इम्रान अली यांच्याकडे सोपवले. मात्र एवढे सोनं बघून दोघांना लालची सुटली आणि सोन्यासह ते पश्चिम बंगालला पसार झाले. 


सोने पळविल्यापैकी २२ तोळे सोने त्यांनी विकले आणि मिळालेल्या पैशातून मौज-मजा केली. उरलेले सोने ते विकणारच होते. त्याआधी त्यांना पोलिसांनी अटक केली. येवेळी तब्बल ३१५ ग्रॅम वजनाचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत.