दीपक भातुसे, मुंबई : मुंबईतील पार्किंग ( Parking Issue ) समस्या आता बिकट होत चालली आहे. यावर आता मुंबई उच्च न्यायालयाने ( Mumbai High Court ) ही चिंता व्यक्त केली आहे. परवडंत म्हणून एका कुटुंबाला 4-5 गाड्या ठेवण्याची परवानगी का देता? असा सवाल ही मुंबई उच्च न्यायालयाने केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पार्किंगची जागा असेल तरच नवी गाडी खरेदीची परवानगी द्यायला हवी. मुंबई आणि आसपासच्या परिसरात पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय असं मत मुंबई उच्च न्यायालयाने मांडलं आहे. हल्ली दोन इमारतींच्या मधल्या रस्त्यांवर कार पार्किंगमुळे चालायलाही जागा नसते, प्रशासनानं आता अंडरग्राऊंड बहुमजली पार्किंगचा गांभीर्यानं विचार करायला हवा. अशी सूचना ही मुंबई उच्च न्यायालयाने केली आहे.


नवी मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते संदीप ठाकूर यांनी पार्किंग समस्येबाबत उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी मुंबई उच्च न्यायालयाने ही तिंचा व्यक्त केली.