मुंबई : Mumbai local travel : लोकल प्रवासाला लसीकरण अट कशाच्या आधारे, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) राज्याच्या मुख्य सचिवांना विचारला आहे. बुधवारपर्यंत उत्तर देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. (Mumbai High Court has asked the Maharashtra Chief Secretary on what basis the local travel vaccination condition)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन लस मात्रा ही लोकल प्रवासासाठी महत्त्वाची अट ठेवण्यात आली आहे. मात्र ही अट कशाच्या आधारे ठेवलीय अशी विचारणा उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे केली. राज्याच्या मुख्य सचिवांना बुधवारपर्यंत प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्टीकरण देण्यास न्यायालयाने सांगितले आहे. तसेच दोन लस न घेतलेल्यांना लोकलप्रवास करू देण्यास परवानगी देणार की नाही, याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत. 


लस प्रमाणपत्राशिवाय प्रवास करू देण्याची राज्य सरकारची तयारी असेल तर आपला आक्षेप नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. लोकल प्रवासासाठी लसीकरण अट कशाच्या आधारे असे म्हणत दोन डोस न घेतलेल्यांना लोकल प्रवासाचे काय, असा थेट सवाल करत राज्याच्या मुख्य  सचिवांकडून स्पष्टीकरण मागितले आहे. आता उच्च न्यायालयाचे स्पष्टीकरणानंतर काय निर्णय देणार याकडे लक्ष लागले आहे.