Bombay High Court Bharti 2023: तुमचे किंवा तुमच्या ओळखीत कोणाचे शिक्षण चौथी पास असून ते नोकरीच्या शोधात आहेत. तर मग काळजी करु नका. कारण मुंबई उच्च न्यायालयात विविध पदांची भरती सुरु असून येथे चौथी पास ते पदवीधरांना चांगल्या पगाराच्या नोकरीची संधी मिळणार आहे. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई उच्च न्यायालयात असिस्टंट लायब्रेरिअन, स्वयंपाकी,  माळीच्या एकूण 8 रिक्त जागा भरल्या जातील. असिस्टंट लायब्रेरिअन पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून पदवी पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. यासोबतच उमेदवाराकडे लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्स सर्टिफिकेट, एमएस सीआयटी आणि संबंधित कामाचा 3 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.  असिस्टंट लायब्रेरिअन पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला 32 हजार ते 1 लाख 1 हजार 600 रुपये इतका पगार दिला जाईल.


राज्याच्या जलसंपदा विभागात बंपर भरती, तुमच्या जिल्ह्यातील नोकरीसाठी 'येथे' पाठवा अर्ज


स्वयंपाकी पदासाठी अर्ज करणारा उमेदवारा किमान चौथी उत्तीर्ण असावा. त्याला स्वयंपाकाचे संपूर्ण ज्ञान आणि कामाचा अनुभव असावा. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 16 हजार 600 ते 52 हजार 400 रुपये पगार दिला जाईल. माळी पदासाठी अर्ज करणारा उमेदवार चौथी पास असावा आणि त्याच्याकडे कामाचा 3 वर्षांचा अनुभव असावा. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 16 हजार 600 ते 52 हजार 400 रुपये पगार दिला जाईल.  मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत असिस्टंट लायब्रेरियन, स्वयंपाकी,  माळी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 21 ते 38 वर्षांदरम्यान असावे. मागासवर्गीय उमेदवारांना यात 5 वर्षांची सवलत देण्यात येणार आहे.  तसेच खुला प्रवर्ग आणि मागासवर्गीय उमेदवारांकडून 200 रुपये अर्ज शुल्क घेण्यात येईल. 


सेंट्रल बॅंक ऑफ इंडियामध्ये विविध पदांची भरती, पदवीधरांनी 'येथे' पाठवा अर्ज


उमेदवारांना नागपूर येथे नोकरी करावी लागेल.  उमेदवारांनी आपले अर्ज प्रबंधक (प्रशासक), मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, सिव्हिल लाईन नागपूर – 400001 या पत्त्यावर पाठवायचे आहेत. 22 नोव्हेंबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.


अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा