COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मुंबई : नरेंद्र दाभोळकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय आणि एसआयटीला सुनावले खडे बोल सुनावले आहेत.  


टार्गेट केलं जाण्याच्या भीतीखाली देशात पुरोगामी वावरतायेत असं म्हणत हत्यांची चौकशी निष्पक्षपणे करा असा मुंबई उच्च न्यायालयाने तपास यंत्रणांना बजावले आहे. 


पुण्यात मॉर्निंग वॉकला गेलेले असताना नरेंद्र दाभोळकरांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीसाठी दाभोळ्कर महाराष्ट्रभर काम करत होते. 20 ऑगस्ट 2013 रोजी दाभोळकरांची हत्या झाली. मात्र अजूनही त्यांच्या खूनांच्या संशयितांचा शोध लागला नाही.