मुंबई : Hindustani Bhau's police custody  : हिंदुस्थानी भाऊ अर्थात विकास पाठक याच्या पोलीस कोठडीत आज पुन्हा वाढ करण्यात आली आहे. 5 फेब्रुवारीपर्यंत एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान  झालेल्या नुकसानाबाबत न्यायालयात बेशर्त माफी मागण्यात आल्याचे वकील अ‍ॅड. महेश मुळ्ये यांनी सांगितले. याबाबत अधिक चौकशी करण्यासाठी हिंदुस्थानी भाऊला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (Hindustani Bhau's police custody increased again)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विकास पाठक तथा हिंदुस्थानी भाऊ याला 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी अधिक चौकशीसाठी पोलीस कोठडी हवी, अशी मागणी सरकारी वकिलांकडून करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने एक दिवसांची कोठडी सुनावली आहे. दरम्यान, दहावी आणि बारावीच्या ऑफलाईन परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी चिथावल्याप्रकरणी आणि मुंबईतल्या धारावीत आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 


हिंदुस्थानी भाऊच्या मागे कोणी राजकीय संस्था आहे का? तसsच त्याला आर्थिक मदत कुठून मिळाली याचा याचा तपास करायचा असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. त्यासाठी हिंदुस्थानी भाऊच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्या या मागणीसाठी मुंबईसह अनेक ठिकाणी शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. या विद्यार्थ्यांना हिंदुस्थानी भाऊने भडवल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. धारावी पोलिसांनी त्याला अटक केली होती.


ऑडिओ क्लिप व्हायरल


हिंदुस्थानी भाऊ अटक झाल्यानंतर त्याच्या समर्थकांची एक ऑडियो क्लिप व्हायरल झाली आहे.  क्लिपमध्ये  हिंदुस्थानी भाऊच्या समर्थनासाठी धारावी पोलीस स्टेशनमधे जमण्याचा संदेश देण्यात आला  होता.  जास्तीत जास्त मुलींना जमण्याचे आवाहन केले होते.  मुली असतील तर पोलीस मारणार नाहीत, असेही वक्तव्य या ऑडियो क्लिपमधे आहे.