Mumbai Housing : मायानगरी मुंबईत किती ही गर्दी, किती ती वाहनं असं कोणीही कितीही म्हटलं तरीही या शहराबद्दल असणारं प्रेम मात्र काही केल्या कमी होत नाही. म्हणूनच की काय बहुसंख्य व्यावसायिक आणि उद्यमींसाठी स्वप्नवत असणारं हे शहर एका वळणावर जाऊन त्यांना आसराही देतं. स्वप्न साकार होताना त्यात आणखी एका स्वप्नाची भर पडते. ते म्हणजे या शहरात अर्थात मुंबईत घर घेण्यासंबंधीचं. (Mumbai)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत स्वत:चं घर हवं, अशी अनेकांचीच इच्छा असते. त्यासाठी आर्थिक जुळवाजुळवही सुरु केली जाते. पण, आता मात्र ही गणितं सोडवू पाहणाऱ्यांना काही अडचणींचा सामना करावा लागणार आहे. 



कारण, मुंबईतील घरांच्या किंमतीत पाच टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. बांधकाम साहित्याच्या दरवाढीमुळे घरांच्या किंमतीवर याचे थेट परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. 


Home Loan Tips: होमलोन घेताय तर, 'या' गोष्टींची घ्या काळजी


तिथे (RBI) रिझर्व्ह बँकेनं रेपो रेटमध्येही वाढ केल्यामुळं गृहकर्ज घेणाऱ्यांनाही मोठा फटका बसताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच आलेल्या अहवालानुसार देशातील महत्त्वाच्या 8 शहरांमध्ये 2022-23 मधील पहिल्या तिमाहित म्हणजेच एप्रिल ते जून महिन्यापर्यंतच्या काळात मालमत्तेच्या दरात वाढ झाली आहे.