Home Loan Tips: होमलोन घेताय तर, 'या' गोष्टींची घ्या काळजी

तुमचा अर्ज फेटाळला जाऊ नये यासाठी कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायचा ते पाहा. 

Updated: Aug 17, 2022, 08:42 PM IST
Home Loan Tips:  होमलोन घेताय तर, 'या' गोष्टींची घ्या काळजी title=
trending news home loan application keep these things in mind before applying for home loan in marathi

Home Loan Tips - आजकाल घर घेणं खूप महाग झाले आहे. आपलं घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी बँका आपल्याला मदत करतात. घर घेण्यासाठी आपण बँकांकडून गृहकर्ज घेतो. वेगवेगळ्या बँका ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी गृहकर्जामध्ये अनेक सवलती देतात. जर तुम्ही घर घेत असाल तर पहिले तुम्हाला बँकेत गृहकर्जासाठी अर्ज करावा लागतो. जर तुमचा अर्ज हा रद्द होऊ नये तर काही गोष्टी लक्षात ठेवा. (trending news home loan application keep these things in mind before applying for home loan in marathi)

अनेक वेळा असं दिसून आलं आहे की, बँकेने गृहकर्ज अर्ज फेटाळला आहे. अर्ज फेटाळण्यामागे वेगवेगळी कारणे असतात. पण तुमचा अर्ज फेटाळला जाऊ नये यासाठी कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायचा ते पाहा. 

Home Loan Application करण्यापूर्वी तुमचा क्रेडिट स्कोअर नीट तपासा.तुमची कमाई आणि मागील दायित्वे यावर तुमचं क्रेडिट स्कोअर अवलंबून असतो. त्यामुळे तुमच्या पगारानुसार कर्जासाठी नेहमी अर्ज करा. म्हणजे तुमचा अर्ज फेटाळण्याची शक्यता कमी होते.

गृहकर्ज घेण्यापूर्वी बँकांचे व्याजदर आणि प्रक्रिया शुल्क इत्यादींची सर्व माहिती योग्यरित्या करु घ्या.यामुळे तुम्हाला नंतर बँकेच्या अटी आणि शर्तींबाबत कोणतीही अडचण येणार नाही. 

एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की क्रेडिट ब्युरो तुमच्या क्रेडिट स्कोअरची कॅलकुलेशन करत असते. त्यामुळे क्रेडिट संबंधित बँकांना चुकीची माहिती देऊ नका.याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम होईल. 

याशिवाय, कर्जाचा अर्ज देताना परतफेडीच्या क्षमतेनुसार गृहकर्जाचा कालावधी निवडा. जर तुम्हाला लहान EMI नुसार कर्जाचे पेमेंट करायचे असेल तर तुम्हाला जास्त कालावधी निवडावा लागेल.