Mumbai news :  (Mumbai Dream home) मुंबईत राहणाऱ्या किंवा या शहरातच लहानाचं मोठं होणाऱ्या प्रत्येकाचंच एक स्वप्न असतं. ते स्वप्न म्हणजे या शहरातच स्वत:चं हक्काचं घर असावं. गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईत घरांच्या दरांमध्ये झालेली लक्षणीय वाढ पाहता अनेकांनीच आपली मिळकत पाहता या स्वप्नांना आवर घातला. तर, काहींनी घराचं स्वप्न पूर्ण तर केलं. पण, त्यांना मुंबईपासून दूर जावं लागलं. कारण, या मुंबईत आता दर चौरस फूटांच्या किंमती झपाट्यानं वाढताना दिसत आहेत. (South Mumbai) दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई यांसारख्या भागांमध्ये असणाऱ्या मोठमोठ्या प्रोजेक्ट्समध्ये घर खरेदी करण्यासाठी कोट्यवधी रुपये मोजले जात आहेत. त्यातच आता एका विक्रमी Deal नं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

IndexTap.com च्या माहितीनुसार Lodha Malabar Palaces by the Sea या प्रोजेक्टमध्ये (Mumbai Industrialist) मुंबईतील व्यावसायिक, (Bajaj Auto chairman) बजाज ऑटोचे चेअरमन नीरज बजाज यांनी एका इमारतीतील 29,30,31 हे तिन्ही मजले विकत घेतले असून त्यासाठी तब्बल 252 कोटी 50 लाख रुपये इतकी किंमत मोजली आहे. या व्यवहारातील स्टॅम्प ड्युटीसाठी त्यांनी 15 कोटी 15 लाख रुपये मोजले असल्याची माहिती मिळत आहे. (Mumbai Housing news triplex at Walkeshwar sold for rs 252 cr latest Marathi news )


कार्पेट एरिया ऐकून धक्काच बसेल 


बजाज यांनी खरेदी केलेल्या या तिन्ही फ्लॅट्स/ ट्रीप्लेक्सला (Triplex) 8 कार पार्किल स्लॉट मिळणार आहेत. यापैकी 29 व्या मजल्यावर असणारा फ्लॅट सर्वाधिक मोठा असून, त्याचा कार्पेट एरिया 6061 चौरस फूट इतका आहे. तर, 30 व्या मजल्यावरील फ्लॅटचा कार्पेट एरिया 3593 चौरस फूट आणि 31 व्या मजल्यावर असणाऱ्या फ्लॅटचा कार्पेट एरिया 2929 चौरस फुटांचा असल्याची माहिती मिळतेय. रेराच्या नियमावलीनुसार एकूण कार्पेट एरिया 12,624 चौरस फूट असल्याचं स्पष्ट होत आहे. 


या ट्रीप्लेक्स फ्लॅटची वैशिष्ट्य म्हणजे यातल्या प्रत्येक फ्लॅटला 1,441 चौरस फुटांची गॅलरी/ वरांडा/ खुला टेरेस देण्यात आला आहे. या महागड्या डीलमध्ये बजाज यांनी साधारण 1,40,277 प्रती चौरस फूट इतक्या दरानं कोट्यवधी रुपये मोजले आहेत. जून 2026 मध्ये हा संपूर्ण प्रोजेक्ट तयार होईल, दोन विंग्समध्ये इथं एकूण 36 फ्लॅट्स बांधले जात असल्याचं सांगण्यात येत आहे (Mumbai Real Estate). 


हेसुद्धा वाचा : Mumbai Housing : वरळीत 240 कोटी रुपयांना एक घर खरेदी करणारा व्यावसायिक आहे तरी कोण?


बजाज यांच्या ट्रीप्लेक्सव्यतिरिक्त या प्रोजेक्टमध्ये 3800 चौरस फुटांचे 4BHK  अपार्टमेंट्सही असून, 5BHK ड्यूप्लेक्स अपार्टमेंटही इथं आहेत. ज्यांचा कार्पेट एरिया 6640 आणि 7995 चौरस फूट इतका आहे.