Mumbai Job Vacancy: मुंबई महानगर पालिका मुंबई शहराच्या नियोजन, व्यवस्थापनाचे काम करते. त्यामुळे पालिकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्यादेखील मोठी आहे. येथे वेळोवेळी रिक्त पदांची भरती केली जाते. दुसरीकडे टाटा मेमोरियल संस्था ही मुंबईतील मोठ्या संस्थांपैकी एक आहे. या दोन्ही आस्थापनांमध्ये सध्या मोठी भरती प्रक्रिया सुरु आहे. याअंतर्गत मुंबई नोकरी करण्याची तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. मुंबई पालिकेअंतर्गत लायसन्स इन्स्पेक्टरच्या एकूण 118 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. या रिक्त पदांसाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागवण्यात आले आहेत.


पात्रता आणि पगार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई पालिकेअंतर्गत लायसन्स इन्स्पेक्टर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे.  लायसन्स इन्स्पेक्टर पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना मुंबईत नोकरी करावी लागणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे तर कमाल वय 43 वर्षे इतके आहे. निवड झालेल्या उमेदवारांना भरतीची वेतनश्रेणी स्तर M17 नुसार पगार दिला जाईल. हा पगार 29 हजार 200 ते  92 हजार 300 रुपयांपर्यंत असेल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. 


अर्ज प्रक्रिया


पालिकेच्या लायसन्स इन्स्पेक्टर पदासाठी अर्ज करत असाल, किंवा कोणाला सांगत असाल तर तुम्हाला याची अर्ज प्रक्रीया, शुल्क माहिती असायला हवी.मुंबई पालिकेच्या अधिकृत वेबसाइटवर जा. तेथे लायसन्स इन्स्पेक्टर भरतीची पीडीएफ दिसेल. येथे भरतीचे शुद्धिपत्रक पाहा. तसेच शेजारी ऑनलाइन अर्जाचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. आणि अर्ज भरा. खुल्या प्रवर्गातील अर्जदारांकडून 1 हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे. मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना यामध्ये 100 रुपयांची सवलत आहे. त्यामुळे त्यांच्या अर्जाचे शुल्क 900 रुपये आहे. लायसन्स इन्स्पेक्टर पदासाठी 20 एप्रिलपासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना यासाठी 17 मे 2024 पर्यत अर्ज करता येणार आहे.


अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा



टाटा मेमोरियल सेंटरमध्ये मेगा भरती


टाटा मेमोरियल सेंटरमध्ये वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी, HBNI फेलोशिपसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. याची अर्ज प्रक्रिया सुरु असून उमेदवारांना 22 मे 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज करताना उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोंदणी करावी लागणार आहे. 18 ते 40 वर्ष वयोगटातील उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात. अर्ज करताना उमेदवाराला 1 हजार रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.


अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा