दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : भाजप नेते किरिट सोमय्या मुंबईतील मंत्रालयात फायली तपासत असतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. किरिट सोमय्या मंत्रालयात अधिकाऱ्यांच्या जागी बसून नेमकं कोणत्या प्रकरणातील फाईली तपासत आहेत, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. हा फोटो मात्र व्हायरल होत आहे. हा फोटो किती दिवस जुना आहे किंवा आजचाच आहे का हे सांगता येत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


अनेक वेळा माहिती अधिकार कायद्यात काही वेळ फाईलीतील संबंधित कागदपत्र पाहण्यासाठी काही वेळ दिला जातो, त्यावेळचा तर हा फोटो नाही ना, असा देखील प्रश्न आहे.


भाजप नेते किरिट सोमय्या यांनी राज्यात भाजपा आणि शिवसेना युतीचं सरकार गेल्यापासून, शिवसेनेवर जोरदार टीकेचा भडीमार केला आहे, एवढंच नाही, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवरही भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत, यात आता हे नवीन काय म्हणून हा फोटो व्हायरल होत आहे.