नवी दिल्ली :  भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी वार्षिक सर्वसाधारण बैठकीत रिलायन्स इंडस्ट्रीजच्या यशाची माहिती दिली. आपले हे यश मुकेश अंबानी यांनी आपले पिता धीरूभाई अंबानी यांना समर्पित केले. हे ऐकल्यावर त्यांची आई कोकिलाबेन या भावुक झाल्या आणि त्यांच्या डोळ्यात पाणी कोसळे. 


मुकेश अंबानींनी काढली धीरूभाईंची आठवण...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या भाषणात मुकेश अंबानी यांनी ४० वर्षांची यशोगाथा आणि विक्रम केवळ एका व्यक्तीला समर्पित करू इच्छितो ते म्हणजे माझे वडील धीरूभाई अंबानी... तसेच ते आपल्या आईचे आभारी असल्याचेही म्हटले. हे ऐकल्यावर कोकिलाबेनच्या डोळ्यात टचकन पाणी आले. त्यांना रडू कोसळल्यावर मुकेश आणि नीता अंबानी भावुक झालेत. 


देशातील सर्वात स्वस्त ४ जी फोन लॉन्च 


रिलायन्स इंडस्ट्रीजच्या आज मुंबई झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत मुकेश अंबानी यांनी देशातील सर्वात स्वस्त ४ जी फोन लॉन्च केला .  मला ही घोषणा करताना आनंद होत आहे की सर्व भारतीयांना हा फोन फ्री भेटणार आहे. गेल्या एजीएममध्ये रिलायन्स जिओ लॉन्च करून धमाका केला होता. अंबानी म्हणाले, सप्टेंबरपर्यंत देशभरात जिओचे १० हजार सेंटर असणार आहेत. जिओ एक वर्षात भारतातील ९९ टक्के लोकांपर्यंत पोहचेल.