Ganeshtotsav 2022 : गणेशोत्सवाच्या निमित्तानं चाकरमानी आता मोठ्या उत्साहात गावाची वाट धरु लागले आहेत. अर्ध्याहून अधिक चाकरमानी तर गावात पोहोचलेही आहेत. पण, नोकरी- शाळांना सुट्ट्या नाहीत, काही महत्त्वाची कामं ताटकळली आहेत म्हणून अगदी शेवटच्या टप्प्यात गावाला जाणाऱ्यांचीही संख्या कमी नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतून मोठ्या संख्येनं गावाची वाट धरणाऱ्या अशाच काही चाकरमान्यांसमोरचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे शेवटच्या टप्प्यात बसगाड्यांची सोय करायची तरी कशी? (Mumbai Konkan Bus Ganeshtotsav 2022 devendra fadnavis shrikant shinde make transport arrangments)


खासगी वाहनांपासून ते अगदी एसटी बसपर्यंत सर्वत्रच गर्दी दिसत असताना गावाला जायचंय खरं, पण नेमकं कसं? अशा विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. कारण काही राजकीय नेतेमंडळींनी गणेश भक्तांसाठी खास बस गाड्यांची सोय करुन दिली आहे. 


निमित्त आगामी निवडणुकांचं असलं तरीही त्याचा फायदा मात्र सर्वसामान्य नागरिकांना होत असल्यामुलं ही दिलासादायक बातमी. 


कोणी सोडल्या किती बसगाड्या? 
( Konkan) कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी भाजपच्या मुंबईतून 300 बसेस सोडण्यात आल्या आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हिरवा झेंडा दाखवला. भाजप सर्वसामान्यांच्या पाठिशी आहे असं फडणवीस यांनी म्हटलं. 


मुंबई भाजपतर्फे अंधेरीतून तीस लक्झरी गाड्या कोकणासाठी रवाना झाल्या. यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित होते. गौरी-गणपती सणाच्या काळात मोठ्या संख्येनं चाकरमानी कोकणात जात असतात मात्र खासगी ट्रव्हल्स चालकांकडून त्यांची लूट केली जाते. ही लूट थांबवण्यासाठी मुंबई भाजपकडून दरवर्षी मोफत बसेस सोडल्या जातात. 


गणेशोत्सवानिमित्त कोल्हापूर-सातारा-सांगलीला जाण्यासाठी चाकरमान्यांना खासदार श्रीकांत शिंदे यांनी मोफत बस सेवा सुरू केली आहे. यासाठी डोंबिवलीतल्या संत श्री सावळाराम महाराज क्रीडा संकुलामधून 350 बसगाड्या सोडण्यात आल्या. तुम्हीही आयत्या वेळी गावाला जाण्याचा बेत आखत असाल तर तुमच्या नजीकच्या भागातून स्थानिक नेते पुरवत असलेल्या बससेवेचा फायदा घेणं योग्य पर्याय ठरू शकतो.