मुंबई :  Lalbaug flyover closed : लालबाग  उड्डाणपूल आजपासून 15 जूनपर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 वाजता या कालावधीत वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. मुख्य रहदारीच्या या उड्डाणपुलाच्या पीयर्सच्या बेअरिंग आणि सांधे बदलणे असे दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे हा उड्डाणपूल बंद ठेवण्यात येत आहे. (Mumbai : Lalbaug flyover in closed for three months)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, हा उड्डाणपूल बंद ठेवण्यात येणार असल्याने परळ पूल आणि परळ टी. टी. जंक्शनकडून येणारी आणि भायखळ्याकडे जाणारी दक्षिण वाहिनीवरील सर्व वाहनांची वाहतूक लालबाग उड्डाणपुलाच्या खालून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडने भायखळ्याच्या दिशेने वळवण्यात आली आहे. भायखळा मार्केटकडून लालबाग उड्डाणपुलाकडे जाणाऱ्या वाहतुकीला देखील पर्याय देण्यात आला आहे. त्यानुसार ही वाहतूक उड्डाणपुलाच्या खालून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडने परळच्या दिशेने जाईल.


तसेच वाहतुकीला कोणताही अडथळा होऊ नये म्हणून भायखळा मार्केटकडून लालबाग उड्डाणपुलाकडे जाणाऱ्या वाहतुकीला देखील पर्याय देण्यात आला आहे. त्यानुसार ही वाहतूक उड्डाणपुलाच्या खालून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडने परळच्या दिशेने वळविण्यात आली आहे.