मोठी बातमी! अंधेरीत मध्यरात्री दरड कोसळली; घरांमध्ये शिरले मातीचे ढिगारे
Mumbai News : रायगडमध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतून आतापर्यंत 27 मृतदेह हाती लागले आहेत. तर अद्याप अनेकजण बेपत्ता आहेत. अशातच मुंबईतही दरड कोसळण्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
Mumbai Landslide : रायगडच्या (Raigad) इरसालवाडीमध्ये दरड (Lrshalwadi landslide) कोसळून 27 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच मुंबईत (Mumbai News) मोठी दुर्घटना घडली आहे. मुंबईतील अंधेरी (Andheri) पूर्व चकाला परिसरातील रामबाग सोसायटीमध्ये मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही दरड कोसळ्याची दुर्घटना घडली आहे. रामबाग सोसायटीच्या बाजूला असलेला डोंगराचा काही भाग कोसळून चाळीच्या पहिल्या मजल्यावरील खोल्यांमध्ये मातीचे ढिगारे शिरले. मध्यरात्री घडलेल्या या घटनेनं सोसायटीमध्ये एकच खळबळ उडाली होती. झोपेत असतानाच अचानक मातीचे ढिगारे चाळीत शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या दरड दुर्घटनामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र पाच ते सहा घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
रामबाग सोसायटीच्या शेजारी असलेल्या डोंगरावरुन चाळीवर सतत माती कोसळत आहे. त्यामुळे चाळीमधील 165 घरांमध्ये राहणाऱ्या कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरड कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमनदलाचा दोन गाड्या आणि मुंबई पोलिसांचे पथर घटनास्थळी दाखल झाले आहे. चाळीमधील नागरिकांनी सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे काम सध्या सुरु आहे.
चकाला येथे असलेली रामबाग सोसायटीत तब्बल 23 वर्षे जुनी आहे. या चाळीमध्ये मध्यरात्री दरड कोसळण्याची दुर्घटना घडली आहे. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास स्फोटासारखा आवाज झाल्याचे नागरिकांनी सांगितले. घरामध्ये रहिवासी झोपेत असतानाच हा सगळा प्रकार घडला. स्थानिकांनी ही माहिती पोलिसांना अग्निशनम दलाला दिली. रामबाग सोसायटीच्या बाजूलाचे असलेल्या या डोंगराचा भाग कोसळून थेट रहिवाशांच्या घरातच शिरला. यामुळे पाच ते सहा घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या घटनांमुळे रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.