मुंबई : Mumbai law and order threat : कोविड संक्रमणाचा धोका वाढल्याने मुंबईत आता नव्याने जमाव बंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे. नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omicron scare) पसरत असल्याने काळजी म्हणून रॅली, आंदोलन आणि सभांना परवानगी नसल्याचे मुंबई पोलिसांकडून काढण्यात आलेल्या आदेशात म्हटलेले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई पोलिसांनी 144 चे कलम लागू करताना नवे आदेश जारी केले आहेत. मुंबईत रात्रीपासून 12 डिसेंबरच्या रात्रीपर्यंत मोर्चा, रॅली किंवा कोणत्याही आंदोलनाला परवानगी देण्यात आलेली नाही.



एमआयएमकडून काही कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार होते, त्यानिमित्याने मुंबई पोलिसांनी आदेश काढल्याची सूत्रांची माहिती आहे. पोलिसांनी जारी केलेल्या आदेशात अमरावती, नांदेडमध्ये झालेल्या हिसाचाराचाही संदर्भ देण्यात आला आहे.


मुंबई पोलिसांनी जमाव बंदी आदेश लागू केल्यानंतर वाहनांची कसून तपासणी सुरु केली आहे. तसेच ठिकठिकाणी नाकाबंदीही केली आहे.