Doctor Fraud Appointment: एखाद्या डॉक्टरची ऑनलाईन अपॉईंटमेंट घ्यायची असेल तर आपण वेबसाईटवर जाऊन अपॉईंटमेंट बुक करतो. मात्र याच ऑनलाईन अपॉईंटमेंटमुळे (Online Appointment) अनेकांना गंडा घातला गेलाय. सायबर चोरट्यांनी (Cyber Crime) वडाळ्यातील एका वकील महिलेला तब्बल सव्वा लाखांचा चुना लावलाय. तर काही दिवसांपूर्वी कांदिवलीतल्या प्राचार्यांनाही मीरा रोडमधील (Mumbai Crime News) रूगणालयात ऑनलाईन अपॉइंटमेंट बुक करताना 17 हजार रूपये गमवावे लागले आहेत. 


सायबर चोरट्यांची मोडस ऑपरेंडी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सायबर गुन्हेगार (Cyber criminals) रूग्णालयाच्या नावाने डुप्लिकेट वेबसाईट्स बनवतात. त्यात रूग्णालय किंवा डॉक्टरांबाबत दिशाभूल करणारी माहिती दिलेले असते. बरेच रूग्ण गुगलवर मिळालेल्या क्रमांकावर संपर्क साधून अपॉईंटमेट घेतात. त्यावेळी अपॉइंटमेंट बुक केल्याचं सांगून 5 रुपयांचं शुल्क भरण्यास सांगितलं जातं. व्हॉटस्अप क्रमांकावर टोकन नंबर पाठवून विश्वास संपादित केला जातो. त्यानंतर सायबर चोरट्यांनी पाठविलेल्या लिंकनुसार व्यवहार केले जातात. 


लोकांच्या फसवणुकीसाठी सायबर चोर वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरत असतात. आता त्यांनी डॉक्टरांच्या ऑनलाईन बुकींच्या माध्यमातून लुटीचा नवा गोरखधंदा सुरू केलाय. त्यामुळे तुम्ही वेळीच सावध व्हा...वेबसाईटची खातरजमा केल्याखेरीज कुठल्याही लिंकवर बुकिंग करू नका. नाहीतर तुमच्यावरही पैसे गमावण्याची वेळ येईल.  


आणखी वाचा - प्रदीप कुरुलकरनंतर आणखी एक अधिकारी हनी ट्रॅपमध्ये? ATS च्या तपासात धक्कादायक माहिती समोर


दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून सायबर गुन्हेगारींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी पोलीस देखील वेगवेगळ्या पातळीवर काम करत आहे. वेगवेगळ्या ट्रिक वापरून लोकांची फसवणूक केली जात आहे. अनोळखी मेसेज किंवा कॉलवरून कुणीही पर्सनल माहिती विचारून लोकांना लुटण्याचं काम केलं जातंय. मात्र, तुम्ही कोणतीही खासगी माहिती देण्याआधी सतर्क राहण्याची गरज आहे.