Mumbai Local : मुंबईच्या लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या एका मोठ्या जनसमुदायाला तुम्ही पाहिलं असेल. नोकरी निमित्तानं दर दिवशी हा लांबचा प्रवास करणारी ही मंडळी खऱ्या अर्थानं घड्याळाच्या काट्यावर धावत असतात. कारण वेळ मागंपुढं झाली आणि एक ट्रेन जरी निघून गेली, तर या मंडळीची पुढली सगळी गणितं गडबडतात. अशाच सीएसएमटी- कर्जत रोखानं प्रवास करणाऱ्यांची चिंता येत्या काही दिवसांमध्ये कमी होणार आहे. रेल्वे विभाग आणि प्रशासकीय यंत्रणांनी घेतलेला एक निर्णय यासाठी कारणीभूत ठरत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पनवेल आणि कर्जत भागाकडे नागरिकांचा वाढता कल पाहता या भागांमध्ये आता रेल्वेचं जाळंही पसरणार आहे. रेल्वे बोर्डाच्या Infrastructure विभागातील सदस्य असणाऱ्या रुप नारायण शंकर यांनी यासंदर्भातील माहिती देत सदरील मार्गांवर रेल्वे कॉरिडोअरसाठी पाहणी प्रक्रिया पार पडल्याचं स्षष्ट केलं. 


रेल्वेच्या या प्रकल्पामध्ये पनवेल आणि कर्जतला जोडणारा एक दुहेरी कॉरिडोर असेल. ज्यासाठी शासनानं 57 हेक्टर खासजी जमीन आणि 4.4 हेक्टर शासकीय जमिनीचा वापर केला आहे. यामध्ये वनांचाही काही भाग वापरण्यात येणार आहे. या नव्या कॉरिडोरमुळं नवी मुंबई आणि रायगड भाग अगदी सहजपणे मोठ्या शहरांशी जोडला जाणार आहे. 


हेसुद्धा वाचा : ऑक्टोबर नव्हे, आधी डिसेंबर होता 10 वा महिना; मग तो 12 व्या स्थानी कसा गेला?


रेल्वेच्या या कॉरिडोअरमुळं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कर्जत प्रवासासाठी लागणाऱ्या वेळात साधारण 30 मिनिटांनी कपात होणार आहे. त्यामुळं आता अनेकांनाच आपल्या घरी वेळेत पोहोचणं शक्य होणार आहे. सध्या 130 मिनिटांच्या या प्रवासासाठी कल्याणमार्गे जाताना अनेकांनाच काही अडचणींचा सामना करावा लागतो. पण, इथून पुढं मात्र ही परिस्थिती सुधारेल. सध्या या प्रकल्पाचं 46 टक्के काम पूर्ण झालं असून 2025 पर्यंत हा प्रकल्प पूर्णत्वास जाणार असल्याची माहिती Mumbai Rail Vikas Corporation (MRVC) कडून देण्यात आली आहे.