38 Hour Harbour Line Mega Block: मुंबईकरांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेकडून हार्बर मार्गावर (Harbour Line) तब्बल 38 तासांचा मेगाब्लॉक (Mega Block) घेण्यात आला आहे. हार्बर मार्गावरील लोकल आता थेट 2 ऑक्टोबरला दुपारी 1 नंतर सुरु होणार आहे. बेलापूर (Belapur) आणि पनवेल (Panvel) स्थानकांमधली वाहतूक शनिवारी रात्री 11 ते सोमवारी दुपारी 1 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद आहेत.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पनवेल उपनगरीय यार्डच्या पुनर्निर्माण कामासाठी, पश्चिम समर्पित फ्रेट कॉरिडॉरसाठी अप आणि डाउन 2 नवीन लाईनच्या बांधकामासाठी या ब्लॉक दरम्यान करण्यात येतं आहे. (mumbai local train 38 hour mega block Harbour Line service will be closed till 2 october )


हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन उपनगरीय सेवा बेलापूर, नेरूळ आणि वाशी स्थानकांपर्यंत (Mumbai News) सुरु असणार आहे. तर ट्रान्सहार्बर मार्गावर अप आणि डाऊन उपनगरीय सेवा केवळ ठाणे आणि नेरुळ/वाशी स्टेशनदरम्यान लोकल धावणार आहेत. 


महामेगाब्लॉकनंतर पहिली लोकल कधी धावणार?


- 2 ऑक्टोबरला सीएसएमटीहून पनवेलसाठी पहिली लोकल 12 वाजून 8 मिनिटांनी धावणार आहे. ही लोकल 1 वाजून 29 मिनिटांनी पनवेल स्टेशनला पोहोचणार आहे. 


- 2 ऑक्टोबरला पनवेलहून सीएसएमटीकडे जाणारी पहिली लोकल1 वाजून 37 मिनिटांनी धावणार आहे. तर ही लोकल 2 वाजून 56 मिनिटांनी सीएसएमटी स्थानकात पोहोचणार आहे. 


- 2 ऑक्टोबरला ठाण्याहून पनवेलसाठी पहिली लोकल 1 वाजून 24 मिनिटांनी सुटणार असून ती 2 वाजून 16 मिनिटांनी पनवेलला दाखल होणार आहे. 


- 2 ऑक्टोबरला पनवेलहून ठाण्यासाठी पहिली लोकल 2 वाजून 1 मिनिटांनी धावणार असून ती 2 वाजून 54 मिनिटांनी ठाण्यात पोहोचणार आहे. 


मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक ?


हार्बर मार्गावर 38 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आल्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार नाही. त्यामुळे मध्य आणि पश्चिम मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.