Mumbai Mega Block : दिवाळीनिमित्त रविवारी तिन्ही मार्गावरील मेगाब्लॉकबद्दल मध्य आणि पश्चिम रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय
Mumbai Local Train Update: मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दिवाळीनिमित्त रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉकबद्दल मध्य आणि पश्चिम रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
No Mega block on Sunday : मुंबईकरांसाठी (Mumbai) एक आनंदाची बातमी आहे. दिवाळीनिमित्त रविवारी तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉकबद्दल मध्य आणि पश्चिम रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दिवाळीनिमित्त मध्य (Central Railway) आणि पश्चिम रेल्वेवर (Western Railway) उद्या मेगा ब्लॉक (Mega Block) नसणारंय. उद्या रविवारी (Sunday ) म्हणाजे 23 ऑक्टोबर 2022 ला मुंबईकरांची मेगाब्लॉकमधून सुटका झाली आहे. त्यामुळे उद्या घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकांसाठी प्रवास सुखकर होणार आहे.
मध्य आणि पश्चिम रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय
लोकल गाड्यांमध्ये गर्दी होण्याची शक्यता असल्याने मेगाब्लॉक घेण्यात येणार नसल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.. मात्र, या दिवशी रविवार वेळापत्रक लागू राहणार असून नेहमीपेक्षा कमी लोकल फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. दिवाळी (Diwali 2022) सुरू झाली आहे, त्यामुळे मुंबईकर खरेदीसाठी आणि नातेवाईकांकडे जाण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. सोमवारी म्हणजे 24 ऑक्टोबरला 2022 लक्ष्मीपूजन (Lakshmi Pujan 2022) आहे. त्यामुळे रविवारी सुट्टी असल्याने या दिवशी बरेच लोक खरेदीसाठी बाहेर पडतात. त्यामुळे या रविवारी रेल्वेच्या कोणत्याही लाईनवर मेगा ब्लॉक राहणार नाही. (Mumbai Local Train Update No Mega block on Sunday 23 October 2022 nmp)
प्लॅटफॉर्म तिकिटात पाचपट वाढ
तरदुसरीकडे दिवाळीच्या गर्दीमुळं प्लॅटफॉर्म तिकिटात (Platform Ticket) पाचपट वाढ करण्यात आलीय..10 रुपयांचं प्लॅटफॉर्म तिकीट 50 रुपयांवर आले... छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Terminus), दादर (Dadar) , ठाणे (Thane) , कल्याण (Kalyan) , कुर्ला (Kurla) आणि पनवेल (Panvel) रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म तिकीट महागलंय..