मुंबई : तुम्ही लोकलने प्रवास करताना सावधनता बाळगा. तसेच मोबाईलचा मुळीच वापर करु नका. अन्यथा मोबाईलचा वापर तुमच्या जिवावर बेतू शकतो. मुंबईत अशाच घटनांत वाढ होताना दिसत आहेत. मोबाईल चोराने मोबाईल लांबविण्यासाठी तरुणीच्या डोक्यात बांबू मारला आणि तिचा मोबाईल हिसकावून नेला. मात्र, या दुर्घटनेत तिला हात-पाय गमवावे लागलेत.


डोक्यात बांबूचा जोरदार फटका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कल्याणची द्रविता सिंग (२३) ही लोकलने प्रवास करत होती. त्याचवेळी धावत्या लोकलच्या दरवाजात उभी राहून मोबाईलवर बोलत होती. तिला मोबाईलवर बोलणे महागात पडले. सिग्नलच्या पोलमागे लपलेल्या एकाने तिच्या डोक्यात बांबूचा जोरदार फटका मारला तेव्हा ती तरुणी लोकलमधून खाली कोसळली. दुर्दैवाने बाजूच्या ट्रकवरून येणाऱ्या भरधाव लोकलने तिला धडक दिली. या दुर्घटनेत तिला आपला एक हात आणि पाय गमवावा लागला.


अल्पवयीन मोबाईल चोराला अटक


मस्जिद बंदर आणि सॅण्डहर्स्ट रोड स्थानकांदरम्यान बुधवारी ही घटना घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच सीएसएमटी पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु करून खबऱ्यांमार्फत माहिती घेतली. गुरुवारी तो आरोपी सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाबाहेर येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्या अल्पवयीन मोबाईल चोराला अटक केली आहे.