मुंबई : मालाड पोलिसांनी एका 24 वर्षीय तरूणाविरूद्ध तक्रार दाखल केली आहे. 27 वर्षीय तरूणाच्या घरात घुसून त्याच्यावर जीवघेणा हल्ला आणि मारहाण केल्या प्रकरणी हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपी हा मालाड येथील भेंडी चाळीत राहणारा आहे. तर, पीडित तरूणही त्याच परिसरात राहणारा आहे.


फेसबुकवरून झाली मैत्री


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीडित युवकाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, पीडित युवक आणि आरोपी तरूण यांची 6 महिन्यांपूर्वी फेसबुकवर ओळख झाली होती. फेसबुकवरची ही ओळख मैत्रितही बदलली. त्यामुळे दोघांध्ये नेहमी ऑनलाईन गप्पा होत असत. पण, बऱ्याचदा या गप्पा अश्लिल स्वरूपाच्या असत. बुधवारी हा तरूण घरात एकटाच असताना आरोपी तरूण तेथे पोहोचला. त्याने पीडित युवकाला चहा बनवून देण्याचा आग्रह केला. पीडित युवकाने चहाही बनवला. मात्र, थोड्याच वेळात आरोपी तरूणाने त्याला माझ्याशी शरीरसंबंध कर असा आग्रह धरला.


सेक्सला नकार देताच


दरम्यान, तरूणाच्या या विचित्र मागणीमुळे पीडित तरूण गोंधळून गेला. त्याने आरोपीसोबत शरीसंबंध करण्यास नकार दिला. निकार मीळताच आरोपी चिडला. त्याने पीडित युवकाला लोखंडी रॉड आणि लाता-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. या मारहाणीत पीडित तरूण गंभीर जखमी झाला.


पीडित तरूणाच्या डोक्याला मार


दरम्यान, पीडित तरूणाच्या ओरडण्याचा आवाज येताच आजूबाजूचे लोक घटनास्थळावर दाखल झाले. घटनास्थळावर पोहोचलेल्या नागरिकांनी पीडित तरूणाला जान्हवी हॉस्पीटलमध्ये दाखल केले. यूवकाची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचे समजते. पीडिताच्या डोक्याला मार लागला असून, सात टाके पडले आहेत.


आरोपीकडून अद्यापही भीती


दरम्यान, पीडित युवकाच्या कुटुंबियांनी आणि स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा अत्यंत विकृत वृत्तीचा तरूण आहे. त्याच्या विरोधात पोलिसांमध्ये आणखी दोन गुन्हे दाखल आहेत. त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. पीडित युवक हा एका स्कूलमध्ये शिपायाचे काम करत होता. मात्र, पगार कमी असल्याच्या कारणावरून त्याने नेकरी सोडली. दरम्यान, आरोपीसोबत त्याची फेसबुकवरून मैत्री झाली. मात्र, आरोपीने पीडित युवकाचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पीडित तरूण आणि त्याचे कुटुंबिय अद्यापही भीतीच्या छायेत आहेत. त्यांना आरोपी पुन्हा हल्ला करेन अशी भीत वाटते.


डीसीपी विक्रम देशमाने यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, आरोपीविरूद्ध भा.दं.सं 324 आणि 504 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालाड पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.