मुंबई : कोरोना रूग्णांचा आकडा वाढत चालला असताना रूग्णांसमोर संकटच उभी राहित आहेत. कोरोना रूग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजनचा अभाव असल्यामुळे अनेकांनी आपला जीव गमावला आहे. अशा परिस्थितीत एक देवदूत समोर आला आहे. ज्याने चक्क आपली SUV कार विकून ऑक्सिजन सिलेंडर खरेदी केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील शाहनवाज शेख (Shahnawaz Sheikh) हा 'ऑक्सिजन मॅन' म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. या व्यक्तीने आपली SUV कार विकून कोरोनाबाधित रूग्णांसाठी ऑक्सिजन सिलेंडर खरेदी केले आहेत. याकरता शाहनवाज यांनी एक हेल्पलाईन सुरू केली असून ते कोरोनाबाधित रूग्णांना मदत करत आहेत. 


मिळालेल्या माहितीनुसार, शेख यांना अनेक मदती मिळावी म्हणून फोन येत होते. यामध्ये ऑक्सिजनची मागणी केली जात होती. अशावेळी पूर्ण मदत करण्याचा हेतू असूनही ऑक्सिजनची मदत करता येत नव्हती. कोरोनाबाधितांना ऑक्सिजन पुरवठा करता यावा म्हणून या पठ्याने चक्क आपली SUV कार विकली आहे. शाहनवाज शेख यांनी 22 लाख रुपयांची SUV कार विकली असून 160 ऑक्सिजन सिलेंडर खरेदी केले आहेत. 


मित्राच्या पत्नीचं निधन झाल्यावर केला निश्चय 


रिपोर्टनुसार, गेल्यावर्षी शाहनाज शेखच्या मित्राच्या पत्नीचा ऑक्सिजन अभावी निधन झालं आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे ऑटो रिक्षेतच त्यांच निधन झाले. त्याचवेळी त्यांनी मदत करण्याचा निर्णय घेतलं. याकरता आता त्यांनी हेल्पलाइन नंबर सुरू केलं आहे. तसेच त्यांनी वॉर रूम देखील तयार केली आहे.