Mumbai Corona : मुंबईत लॉकडाऊन लागणार की नाही? महापौर म्हणतात...
मुंबईत कोरोनाचे (Mumbai Corona patients) नवे रुग्ण हे आता ५ हजाराच्या घरात येऊ लागले आहेत. त्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढलेली आहे. त्यात बाजार, लोकलमध्ये (Mumbai Local) होणारी गर्दी आणि नियमांचं उल्लंघन कोरोनाला आमंत्रण देत आहे. अशात राज्यामध्ये इतर जिल्ह्यांमध्ये जसा लॉक़डाऊन (Mumbai lockdown) लावण्यात येत आहे, तसेच मुंबईतही होणार का, याकडे मुंबईकरांचं लक्ष लागून राहिलेले.
मुंबई : मुंबईत कोरोनाचे (Mumbai Corona patients) नवे रुग्ण हे आता ५ हजाराच्या घरात येऊ लागले आहेत. त्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढलेली आहे. त्यात बाजार, लोकलमध्ये (Mumbai Local) होणारी गर्दी आणि नियमांचं उल्लंघन कोरोनाला आमंत्रण देत आहे. अशात राज्यामध्ये इतर जिल्ह्यांमध्ये जसा लॉक़डाऊन (Mumbai lockdown) लावण्यात येत आहे, तसेच मुंबईतही होणार का, याकडे मुंबईकरांचं लक्ष लागून राहिलेले.
लॉकडाऊनबाबत काय म्हणाल्या मुंबईच्या महापौर?
1. गेल्या वर्षी मृत्यूदर जास्त होता. मात्र आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. गेल्या वर्षी ५ टक्क्यांहून अधिक असलेला मृत्यूदर (Mumbai corona death rate) आता 2 टक्क्यांच्या दरम्यान आहे. त्यामुळे लॉकडाऊन होणार नाही, असं आपण बघू, असं महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai mayor Kishori Pednekar) म्हणाल्या आहेत. सध्या मुंबईत रात्रीची जमावबंदी सुरू राहील. म्हणजेच ५ जणांपेक्षा जास्त लोकांना एकत्र फिरण्याची मुभा नसेल.
मुंबईत झोपडपट्ट्यांपेक्षा मोठ्या इमारतींमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागली आहे, अशी माहितीही महापौरांनी दिली. त्यामुळेच ज्या ठिकाणी ५ पेक्षा अधिक रुग्ण आढळतील, त्या इमारती सील केल्या जात असल्याचे त्या म्हणाल्या.
सध्या मुंबईत १५ हजार बेड्स आहेत, आणि २५ हजार बेड्सची तयारी सुरू आहे. दिवसाला बेडसाठी १०० फोन येत आहेत, म्हणजेच रुग्णसंख्या प्रचंड वाढत असल्याचेही त्या म्हणाल्या.
याशिवाय मंत्रालयाच्या वेळा ज्याप्रमाणे बदलल्या आहेत, त्याचप्रमाणे खाजगी कार्यालयांनीही कार्यालयीन वेळा बदलाव्यात, असं आवाहन महापौरांनी केले आहे, जेणेकरून एकाच वेळी लोकल/बसमध्ये होणारी गर्दी नियंत्रणात येईल.