Mumbai Local Mega Block News : मुंबईत रविवारी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉकसह शॅडो ब्लॉक घेण्यात येणार आहे. यांत्रिक कामे आणि रेल्वे दुरुस्तीच्या कामांसाठी हा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे अनेक लोकलच्या सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रविवारी मुंबईत फिरण्याचा किंवा लोकलने प्रवास करणार असाल तर कुठे मेगाब्लॉक आहे, ते माहित करुन घ्या, अन्यथा तुमचा खोळंबा होईल. तर मध्य रेल्वे आज आणि उद्या रविवारी शॅडो ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे काही गाड्या दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. तर 9 एप्रिल 2023 रोजी सांताक्रूझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान पश्चिम रेल्वेचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे.


हार्बर मार्गावर मेगाब्लॉक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य रेल्वेवरी रविवार 9 एप्रिल मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. कुर्ला - वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत हा ब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 वाजेपर्यंत पनवेल, बेलापूर वाशीकडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा आणि वाशी, बेलापूर, पनवेल येथून सकाळी 10.16 ते दुपारी 3.47 वाजेपर्यंत  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.


 सांताक्रूझ आणि गोरेगाव जम्बोब्लॉक


9 एप्रिल 2023 रोजी सांताक्रूझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान पश्चिम रेल्वेचा जम्बो ब्लॉक असणार आहे. ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी सांताक्रूझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गांवर रविवार, 9 एप्रिल, 2023 रोजी सकाळी 10.00 ते 15.00 वाजेपर्यंत पाच तासांचा जंबो ब्लॉक पाळण्यात येईल. ब्लॉक काळात सांताक्रूझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान उपनगरीय सेवा धीम्या मार्गावर चालतील. बोरिवलीहून काही गाड्या गोरेगाव स्थानकापर्यंत धावतील. ब्लॉक दरम्यान काही उपनगरीय गाड्या रद्द राहतील.


हार्बर प्रवाशांना दिलासा


 ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - कुर्ला आणि पनवेल - वाशी या भागांत विशेष लोकल चालविण्यात येणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे - वाशी/नेरुळ मार्गे ट्रान्सहार्बर मार्गावरून सकाळी 10.00 ते सायंकाळी  6.00 वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी असेल.


मेन लाईनवर मेगाब्लॉक नाही, पण गर्डरसाठी पॉवर ब्लॉक


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण दरम्यान मेन लाईनवर मेगाब्लॉक नाही, असणार नाही. मात्र, मध्य रेल्वेवर आज आणि उद्या मध्यरात्री कोपर ते ठाकुर्ली दरम्यान गर्डर लॉन्च करण्यासाठी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. आज शनिवार आणि उद्या रविवार मध्यरात्री 1.35 ते 5.5 वाजेपर्यंत कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांदरम्यान ब्लॉक असणार आहे.


 मध्य रेल्वेवर शॅडो ब्लॉक


 मध्य रेल्वेवर शॅडो ब्लॉक घेण्यात आला आहे. आज आणि उद्या 1.00 ते 4.45 वाजेपर्यंत टिटवाळा अप/डाऊन लाईन आणि ईएमयू साईडिंगवरील रोड ओव्हर ब्रिजसाठी गर्डरचे लॉन्चिंग करण्यात येणार आहे. वासिंद येथे अप/डाउन लाईनवर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमध्ये (ड्युअल व्ह्यू डिस्प्ले)  बदल करण्यासाठी साईट स्वीकृती चाचणी 2.00 ते ०4.30 वाजेपर्यंत असणार आहे.


 उपनगरीय लोकल सेवेवर परिणाम


 उपनगरीय  ठाणे आणि कर्जत/कसारा दरम्यानच्या उपनगरीय सेवा रात्री 12.20  ते पहाटे 5.00  वाजेपर्यंत रद्द राहतील. अनेक लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.
कर्जतच्या दिशेने ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल :  अंबरनाथ लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 23.51 वाजता सुटणारी.
- कसाराच्या दिशेने ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल : TL-  टिटवाळा लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 22.50 वाजता सुटणारी.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने ब्लॉकनंतर पहिली लोकल: विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस  लोकल कर्जत येथून 4.10 वाजता सुटणारी.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने ब्लॉक नंतर पहिली लोकल: N4 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल कसारा येथून 4.59 वाजता सुटणारी.


 लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रात बदल


- 11087 वेरावळ-पुणे एक्सप्रेस भिवंडी येथे १ तासासाठी नियमित केली जाईल
- 22177 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -वाराणसी एक्स्प्रेस आणि 
22538 लोकमान्य टिळक टर्मिनस - गोरखपूर एक्स्प्रेस ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर वळवण्यात येतील.
अप गाड्यांचे नियमन
- 18030 शालीमार- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस आसनगाव स्थानकावर ०२.३७ ते ०५.३० या वेळेत नियमित केली जाईल आणि निर्धारित वेळेच्या १ तास ५० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचेल.
- 12810 हावडा- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस  एक्स्प्रेस आटगाव स्थानकावर ०२.३८ ते ४.२५ या वेळेत नियमित केली जाईल आणि निर्धारित वेळेच्या १ तास ४० मिनिटे उशीरा पोहोचेल.
- 20204 गोरखपूर - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस खर्डी स्थानकावर ०२.५५ ते ४.२५ या वेळेत नियमित केली जाईल आणि निर्धारित वेळेपेक्षा १ तास ३० मिनिटे उशिरा पोहोचेल.
- 11402 आदिलाबाद - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस आणि 
12152 शालीमार - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस कसारा स्टेशनवर ०३.२३ ते ०४.३० या वेळेत नियमित केली जातील आणि निर्धारित वेळेच्या १ तास ५० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील.
- 12112 अमरावती - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस  एक्स्प्रेस आणि 
12106 गोंदिया - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस  एक्स्प्रेस इगतपुरी स्थानकावर ०३.३५ ते ४.२५ या वेळेत नियमित केल्या जातील आणि त्यांच्या निर्धारित वेळेपेक्षा ५० मिनिटे ते १ तास उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील.


 येणाऱ्या गाड्या कर्जत - पनवेल - दिवा मार्गावरुन वळण्यात आल्यात


- 11020 भुवनेश्वर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस  एक्सप्रेस
- 18519 विशाखापट्टणम – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
- 12702 हैदराबाद - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस  एक्सप्रेस
- 11140 गदग- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस  एक्सप्रेस
- 22158 चेन्नई- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस  एक्सप्रेस
- 11022 तिरुनेलवेली- दादर एक्सप्रेस
 - 17058 अप देवगिरी एक्सप्रेस,
 - 12618 अप मंगला- लक्षद्वीप एक्सप्रेस,
 -  12138 अप पंजाब मेल शेड्यूलपेक्षा 15 ते  20मिनिटे उशिरा पोहोचेल आणि सर्व विलंबित मेल/एक्सप्रेस/हॉलिडे स्पेशल ट्रेन ऑपरेशनल आवश्यकतेनुसार नियमित/पुन्हा शेड्युल केल्या जातील.