मुंबई : मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. मुंबईकरांची लाईफलाईन असणाऱ्या लोकलवर विविध अभियांत्रिकी कामांसाठी रविवारी 14 ऑगस्टला मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते विद्याविहार...तर हार्बर रेल्वेवर कुर्ला ते वाशी दरम्यान मेगाब्लॉक असणार आहे. पश्चिम रेल्वेवर आज मेगाब्लॉक नसणार आहे.  (mumbai mega block update sunday 14 august mega block on central and harbour line)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य रेल्वे मेगाब्लॉक
रविवारी सीएसएमटी – विद्याविहार दरम्यान अप आणि धीम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. म्हणून सीएसएमटी येथून सकाळी 10.48 ते दुपारी 3.49  या वेळेत सुटणाऱ्या धीम्या लोकल सीएसएमटी-विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील.


मेगाब्लॉक असल्यामुळे लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकावर थांबतील. पुढे पुन्हा डाउन धिम्या मार्गावर वळवल्या जाणार आहेत.


घाटकोपर येथून सकाळी 10.41 ते दुपारी 3.52 पर्यंत सुटणाऱ्या अप आणि धिम्या मार्गावरील लोकल विद्याविहार आणि सीएसएमटी दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. 


सकाळी 10.41 ते दुपारी 3.52 पर्यंत सुटणाऱ्या लोकल  कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा  स्थानकांवर थांबतील. त्यामुळे आज मध्यरेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवासांची गैरसोय होणार आहे. 


हार्बर रेल्वे मेगाब्लॉक
आज कुर्ला-वाशी दोन्ही मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. यामुळे सकाळी 10.34 ते 3.36 या वेळेत पनवेल, बेलापूर, वाशी करीता जाणाऱ्या लोकल आणि वाशी बेलापूर, पनवेल येथून सकाळी 10.16 ते दुपारी 3.47 वाजेपर्यंत सीएसएमटी दिशेने जाणाऱ्या अप लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. यादरम्यान हर्बर रेल्वे मार्गावर विशेष लोकल चालवण्यात येणार आहे.