मुंबई : मुंबईत मेट्रोने प्रवास करणा-या प्रवाश्यांच्या  खिश्याला कात्री लावणारी बातमी आहे. मुंबई मेट्रो वन कंपनीनं ५ रुपयांपर्यंत भाववाढ केली आहे. मात्र एका बाजूनं प्रवास करणा-या भाड्यात कोणताही बदल केला नाही. पण रिटर्न म्हणजेच परतीचा प्रवास करणाऱ्या प्रवासात ५ रुपयांची भाडे वाढ आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, या बाबत कोणतीही पूर्व सूचना दिली नव्हती. त्यामुळं प्रवाशांनी नाराजी व्यक्त केलीये. अगोदर भाड्यात सुट होती. ती सुट आता मेट्रो कंपनीनं कमी केलीये.


नवीन दरानुसार प्रवाशांना मोजायला लागणार एवढे पैसे


घाटकोपरहुन  


जागृती नगर - असल्फापर्यंत २० रुपये


साकीनाका  - विमानतळपर्यंत  ३५ रुपये


चाकाला- वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे - अंधेरी पर्यंत ५५ रुपये


आझाद नगर -डीएन नगर -  वर्सोवापर्यंत ७० रुपये