Mukesh Ambani Chef Salary : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या दहामध्ये भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Amban) यांचा क्रमांक लागतो. मुकेश अंबानी अब्जाधीश आहेत, पण ते तितक्याच नम्र स्वभावासाठी देखील ओळखले जातात. मुंबईतल्या पेडर रोडइथल्या हिल ग्रेंज हायस्कूलमध्ये त्यांचं शालेय शिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजीमधून केमिकल इंजीनिअरिंगची डिग्री घेतली. पुढे त्यांना स्टॅनफोर्ड विश्वविद्यालयात एमबीएसाठी  (MBA) प्रवेश घेतला. मुकेश अंबानी यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते पूर्णपणे शाकाहारी (Vegetarian) आहेत, शिवाय त्यांना कोणतंही व्यसन नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुकेश अंबानी यांचं आवडतं जेवण
मुकेश अंबानी यांना साधं जेवणच आवड असल्याचं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. भात-डाळ आणि चपाती भाजी हे त्यांचं आवडीचं जेवण आहे. विशेष म्हणजे कुठेही असले तरी त्यांना घरचं जेवणच आवडतं. कोणत्याही हॉटेलमध्ये किंव कॅफेमध्ये जेवण घेताना सहसा त्यांना कोणी बघितलेलं नाही. 


साऊश इंडियन नाष्टा
भारतीय जेवणाव्यतिरिक्त मुकेश अंबानी यांना थाई व्यंजन आवडतात. रविवारी त्यांना नाष्ट्यात इडली-सांबार ही साऊथ इंडियन डिश असते. मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी एका मुलाखतीत हा खुलासा केला होता. दिवसभर कितीही व्यस्त असले तरी रात्रीचं जेवण (Dinner) ते आपल्या कुटुंबाबरोबरच करतात. 


अंबानींच्या शेफला किती पगार?
अंबानी कुटुंबाच्या जेवणाची आवड-निवड सांभाळण्यासाठी आचाऱ्याची (Ambani Family Cook) महत्त्वाची भूमिका असते. अनेक परीक्षा पास झाल्यानंतर आचाऱ्याची एंटीलिया बंगल्यात वर्णीलागते. त्यामुळे त्याला किती पगार असतो याची सर्वांनाच उत्सुकता आहे. 2017 मध्ये मुकेश अंबानी यांच्या खासगी ड्रायव्हरच्या मासिक पगाराबाबत खुलासा झाला होता. त्याला जवळपास महिना 2 लाख म्हणजे वार्षिक 24 लाख रुपये इतका पगार आहे. अंबानी यांच्या आचाऱ्यालाही जवळपास तितकाच पगार आहे. (ambani family cook salary)


एका अहवालानुसार अंबानी यांच्या आचाऱ्याला महिन्याला 2 लाख रुपये पगार दिला जातो. एंटीलियातील प्रमुख कर्मचारी जवळपास याच रेंजमध्ये पगार घेतात. पगाराशिवाय या कर्मचाऱ्यांना जीवन बिमा, मुलांच्या शिक्षणाचेही पैसे मिळत असल्याचं समोर आलं आहे.