मुंबईत कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवल्यानं रूग्णांची संख्या वाढल्याचा दावा
रविवारी ११,८६१ चाचण्या करण्यात आल्या
मुंबई : मे आणि जून महिन्यात रोज सरासरी ४ हजार, जुलै महिन्यात रोज सरासरी ६५००, ऑगस्ट महिन्यात रोज ७६१९ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. सप्टेंबर महिन्यात ९ ते १० हजार रोज कोरोना चाचण्या मुंबईत केल्या जात आहेत. काल तर ११,८६१ चाचण्या करण्यात आल्या असून चाचण्यांची संख्या रोज १० हजार ते १४ हजारांवर नेली जाणार आहे. यामुळं १००० ते १३०० दरम्यान वाढत असलेली रूग्णसंख्या १७०० ते २००० दरम्यान वाढत आहे. यामध्ये रॅपिड टेस्टची संख्या धरण्यात आलेली नाही.
मुंबईत येत्या ३ दिवसांत २५० आयसीयू बेड उपलब्ध केले जाणार, यामुळं रोज ३५० आयसीयू बेड रिकामे राहतील. मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंग चहल यांची माहिती. सध्या ४८०० बेड मुंबईत रिकामे असून येत्या काही दिवसांत जम्बो फॅसिलिटी सेंटरमध्ये आणखी ६२०० बेड वाढवले जाणारेत
वाढत असलेल्या रूग्णसंख्येला सामावून घेण्यासाठी मुंबईत पुरेसे बेड उपलब्ध असल्यानं मुंबईकरांनी घाबरू नये, असं आवाहन मुंबई महापालिकेतर्फे करण्यात आलं आहे.
आतापर्यंत ४२ लाख कोरोनाबाधितांचा आकडा पार केला आहे. रविवारी एकाच दिवशी सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. ९०,८०२ कोरोनाबाधित रुग्ण एकाच दिवशी सापडले असून गेल्या २४ तासात १०१६ कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावला आहे.
आतापर्यंत ४२,०४,६१४ कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आहे. यामध्ये ८,८२,५४२ रुग्ण ऍक्टिव्ह असून ३२,५०,४२९ बाधितांना घरी सोडले आहे. एकूण ७१,६४२ बाधितांनी आपला जीव गमावला आहे.