मुंबई महापालिकेला ३० कोटींचा दंड, हरीत लवादाचा निर्णय
सांडपाण्यावर प्रक्रीया न झाल्याने खाडी, समुद्र प्रदुषित
मुंबई : मुंबई महानगर पालिकेला ३० कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. राष्ट्रीय हरित लवादाने हा निर्णय घेतलाय. सांडपाणी प्रक्रीया न करताच समुद्रात सोडल्याने मुंबई महानगरपालिकेला हा दंड ठोठावण्यात आला आहे.
सांडपाण्यावर प्रक्रीया न झाल्याने खाडी, समुद्र प्रदुषित झालाय. याचा ठपका पालिकेवर ठेवण्यात आलाय.