मुंबई : कोरोनावर (Corona) मात करण्यासाठी 18 वर्षावरील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. त्यानंतर आता 2 ते 18 वयोगटातील मुलांना लस देण्यास परवानगी देण्यात आली आहे. देशातील मुलांसाठी कोरोना लस (Covid Vaccination) आली असून, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Ministry of Health) भारत बायोटेकला परवानगी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पार्श्वभूमीवर आता 2 ते 18 वयोगटातील मुलांना लस देण्यासाठी मुंबई महानगर पालिकेनेही (Mumbai Municipal Corporation) तयारी सुरु केली आहे. केंद्र शासनाकडून सविस्तर गाईडलाईन (Covid-19 Guidelines) आल्यानंतर 2 ते 3 दिवसांत लहान मुलांचे लसीकरण सुरु करण्याचा पालिकेचा मानस आहे.


प्रसुतीगृह आणि लहान मुलांची रुग्णालये, महापालिकेची 350 लसिकरण केंद्रे याठिकाणी लहान मुलांचे लसिकरण होईल. लस देण्यासाठीची सिरींज, निडल कदाचित वेगळी असेल, निडलची साईज काय असेल याबाबत स्पष्टता नाही आहे. याबाबत केंद्र सरकारकडून सविस्तर गाईडलाईन येणं गरजेचं आहे. पुरेसा लससाठा करण्यासाठी शीतगृह आहेत. 


मात्र, लहान मुलांसाठीच्या लसीकरता वेगळ्या तापमानाची आवश्यकता असेल का हे गाईडलाईन नंतर समजेल असं पालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 1500 व्यक्तींच्या स्टाफला लहान मुलांच्या लसिकरणासाठी ट्रेनिंग देण्यात येईल. खाजगी रुग्णालयांतील डॉक्टर्सनाही ट्रेनिंग देण्यात येणार आहे. 


लहान मुलांच्या लसिकरणानंतर काही रिअॅक्शन्स आल्या तर यापूर्वीच उभारलेल्या पेडिएट्रीक वॉर्ड उभारण्यात आलेत त्याचा वापर करता येऊ शकेल. लहान मुलांच्या लसिकरणाकरता महापालिका जनजागृती मोहिम हातात घेणार आहे. 


प्रायोगिक तत्वावर ज्या लहान मुलांना आतापर्यंत लसी देण्यात आल्यायेत त्यांच्यावर कोणतेही गंभीर रिअॅक्शन आढळलेल्या नाहीत.