मुंबई : Best Retired Employees Gratuity Problem solved : बेस्ट कर्मचाऱ्यासंदर्भातील महत्त्वाची बातमी. बेस्ट कर्मचाऱ्यांना मुंबई महापालिकेने ग्रॅच्युइटी मिळण्याबाबत गुडन्यूज दिली आहे. आर्थिक डबघाईस आलेल्या बेस्ट उपक्रमातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी देण्यासाठी मुंबई महापालिकेने तब्बल 482 कोटींपेक्षा अधिक रक्कम बेस्ट उपक्रमास दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देण्यात आलेल्या  482 कोटींच्या रकमेत नवीन बसेस भाडेतत्वावर घेण्याचाही समावेश आहे. याकरिता महापालिका प्रशासनाने बँकेच्या 90 हजार कोटी रुपयांच्या ठेवीतून 279 कोटी रुपये काढलेत. बेस्ट उपक्रमाला 482.28 कोटींची आर्थिक मुंबई महापालिकेने मदत दिली आहे.


मुंबई महापालिकेच्या या नव्या निर्णयामुळे आर्थिक डबघाईस आलेल्या बेस्ट उपक्रमातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटीची रक्कम देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.


मुंबई महापालिका प्रशासनाने विविध बॅंकांमध्ये असलेल्या 90 हजार कोटी रुपयांच्या ठेवीतून 279 कोटी रुपये काढलेत. बेस्ट उपक्रमाला यापूर्वीही तीन हजार कोटींची मदत करण्यात आली होती.परंतु हजारो कोटींची मदत करुनही बेस्टची चाके रुळावर येत नाहीत. त्यामुळे मुंबईकर करदात्यांचा पैसा वाया तर जात नाहीय ना याचा विचार करण्याची वेळ आली आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.